काठमांडू ः नेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मकवानपूर जिल्ह्यातील चितलांग येथे 4.5 तीव्रतेचा भूकंप जाणवला. गुरुवारी म्हणजेच 23 न

काठमांडू ः नेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मकवानपूर जिल्ह्यातील चितलांग येथे 4.5 तीव्रतेचा भूकंप जाणवला. गुरुवारी म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी पहाटे हे हादरे बसले. भूकंपात अद्याप कुठेही मोठी हानी झाली नसल्याचे समोर आले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला 3 नोव्हेंबर रोजी नेपाळमध्ये 6.4 तीव्रतेच्या भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. ज्यामध्ये मोठी जीवितहानी आणि वित्तहानी देखील झाली होती. शेकडो लोकांचा त्यात मृत्यू देखील झाला होता. नेपाळ अजूनही 3 नोव्हेंबर रोजी आलेल्या 6.4 तीव्रतेच्या भूकंपातून सावरत आहे. या भूकंपात जीवित आणि मालमत्तेच्या हानीतून नेपाळचे मोठे नुकसान झालं होते.
COMMENTS