Homeताज्या बातम्यादेश

राजस्थानमध्ये 4.2 तीव्रतेचा भूकंप

बिकानेर : राजस्थानच्या बिकानेरमध्ये आज, रविवारी भूकंपाचे धक्के जाणावले आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 एवढी होती. हा भूकंप मध्यरात्री

 प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघात
वंचित बहुजन आघाडी परभणी शेवगाव कार्यालयासमोर आंदोलन | LOKNews24
उशीरा रात्री पिझ्झा न दिल्याने हॉटेलचालकाला मारहाण

बिकानेर : राजस्थानच्या बिकानेरमध्ये आज, रविवारी भूकंपाचे धक्के जाणावले आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 एवढी होती. हा भूकंप मध्यरात्री 2.16 वाजेच्या सुमारास झाला. भूकंपाची खोली 8 किलोमीटर होती. या भूकंपामुळे अद्याप कुठल्या जीवित किंवा वित्तहानीची माहिती पुढे आलेली नाही. राजस्थानमधील बिकानेरशिवाय रविवारी (26 मार्च) पहाटे अरुणाचल प्रदेशातील चांगलांग येथे 3.5 तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाची खोली 76 किमी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने यापूर्वी माहिती दिली होती की 25 मार्च रोजी म्यानमारमध्ये 4.0 तीव्रतेचा भूकंप झाला होता. भूकंप म्यानमारमधील बर्माच्या उत्तरेस 10 किमी अंतरावर आणि 106 किमी खोलीवर झाला.याशिवाय छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये शुक्रवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरजवळ शुक्रवारी सकाळी 10.31 वाजता 4.0 तीव्रतेचा भूकंप झाला.छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये सकाळी 10:28 वाजता 3.9 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. छत्तीसगडमधील अंबिकापूरमध्ये सुमारे 6 सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले होते.

COMMENTS