रायपूर : छत्तीसगडमध्ये शुक्रवारी भूकंपाचे धक्के जाणवले. सूरजपूर जिल्ह्यात सकाळी 10.30 वाजता रिश्टर स्केलवर 4.1 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात

रायपूर : छत्तीसगडमध्ये शुक्रवारी भूकंपाचे धक्के जाणवले. सूरजपूर जिल्ह्यात सकाळी 10.30 वाजता रिश्टर स्केलवर 4.1 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू भातगावपासून 11 किमी अंतरावर आहे. छत्तीसगडच्या उत्तर भागात भूकंपाचे धक्के अधिक जाणवले. उत्तर छत्तीसगडमध्ये गेल्या 10 महिन्यांतील हा सहावा भूकंप आहे. यासंदर्भातील माहितीनुसार सुरगुजा विभागात भूकंपाचा सर्वाधिक परिणाम दिसून आला. बराच वेळ भूकंपाचे धक्के जाणवत असल्याचे तेथील स्थानिक लोकांनी सांगितले.
COMMENTS