हिंगोली ः औंढा नागनाथ येथील शासकिय विश्रामगृहाजवळ एका कारच्या तपासणीमध्ये 9.65 लाख रुपयांचे किंमतीच्या 38 किलो 600 ग्राम गांजासह 14.65 लाखांचा ऐव

हिंगोली ः औंढा नागनाथ येथील शासकिय विश्रामगृहाजवळ एका कारच्या तपासणीमध्ये 9.65 लाख रुपयांचे किंमतीच्या 38 किलो 600 ग्राम गांजासह 14.65 लाखांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांवर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. 2 रात्री गुन्हा दाखल झाला आहे. कारची तपासणी केली असता त्यामध्ये खाकी रंगाचे 14 पाकिटे चिकटपट्टीने घट्ट गुंडाळलेली दिसून आले. पोलियांनी पाकिटे उघडून पाहिले असता त्यात गांजा असल्याचे स्पष्ट झाले. आरोपींमध्ये पूर्णा लोहमार्ग चौकीच्या पोलिस कर्मचार्याच्या समावेश आहे.
COMMENTS