Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भंडार्‍यातील आश्रमशाळेत 37 मुलांना विषबाधा

भंडारा : जिल्ह्यातील एका आदिवासी आश्रमशाळेत शिकणार्‍या 37 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. तुमसर तालुक्यातील येरली ये

दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी 1 लाख रूपये मदत करा
क वर्ग तीर्थक्षेत्रासाठी 70 लाख रुपये निधी मंजूर ः थोरात
देवळाली प्रवरा नगरपालिकेत स्वातंत्र्य दिन उत्साहात

भंडारा : जिल्ह्यातील एका आदिवासी आश्रमशाळेत शिकणार्‍या 37 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. तुमसर तालुक्यातील येरली येथे आश्रमशाळेत हा प्रकार घडला. विद्यार्थ्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चौघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. तब्बल 37 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली. चौघांची स्थिती चिंताजनक असून उर्वरित 33 जणांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. विद्यार्थांना काल दुपारच्या जेवणात बटाटा, वाटाणा, चपाती, वरण, भात असा आहार देण्यात आला होता. यानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांच्या पोटात दुखायला लागले. काही विद्यार्थांना चक्कर येऊ लागली. याची तक्रार विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडे केली.

COMMENTS