नवी दिल्ली : उत्तराखंडमधील अल्मोडा येथे सोमवारी सकाळी 8 वाजता एक प्रवासी बस 150 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 36 जणांचा मृत्यू झाला, तर 6 जण जख

नवी दिल्ली : उत्तराखंडमधील अल्मोडा येथे सोमवारी सकाळी 8 वाजता एक प्रवासी बस 150 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 36 जणांचा मृत्यू झाला, तर 6 जण जखमी झाले. अल्मोडा येथील कुपीजवळ हा अपघात झाला. बसमध्ये 42 प्रवासी होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. कुमाऊं विभागाचे आयुक्त दीपक रावत म्हणाले, ’अपघातात 36 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.’ नदीच्या 10 फूट आधी झाडात अडकल्याने बस थांबली. दरीत कोसळताना बसला अनेक धक्के लागल्याने अनेक प्रवासी खिडक्याबाहेर फेकले गेले. बस किनाथहून रामनगरकडे जात होती. 28 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 8 जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो.
COMMENTS