अहमदनगर जिल्ह्यातील पतसंस्थांच्या वेळेत बदल

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील पतसंस्थांच्या वेळेत बदल

कोपरगाव शहर प्रतिनिधी- राज्यात दिवसेंदिवस कोरोना आपली आकडेवारी वाढत असताना नगर जिल्ह्यात देखील नवनवीन अकड्याचा उचांक गाठत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मनोंद असलेलं अप्रकाशित मोडीपत्र उजेडात l DAINIK LOKMNTHAN
एकाच रुग्णाला व्हाइट, ब्लॅक, यल्लो फंगसचा संसर्ग; डॉक्टरही चक्रावलेl पहा LokNews24
रुईगव्हाणच्या सरपंचपदी इंदिरा निलेश पवार बिनविरोध

कोपरगाव शहर प्रतिनिधी- राज्यात दिवसेंदिवस कोरोना आपली आकडेवारी वाढत असताना नगर जिल्ह्यात देखील नवनवीन अकड्याचा  उचांक  गाठत आहे. राज्यभरात लॉकडाऊन चे कठोर निर्बध लागले असले तरी पतसंस्था हा अर्थकरणाचा मुख्य कणा असल्याने काही नियम पाळून सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत ठेवण्याचे मुख्य ध्येय पतसंस्था प्रशासनाचे असून याचं अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पतसंस्थाचे कामकाजाच्या वेळेत बदल करण्यात आला असल्याची माहिती सहकार भारती अहमदनगर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष एड. रविकाका बोरावके व अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष सबाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
  या प्रसिद्धीकाद्वारे जिल्ह्यातील सर्व पतसंस्थाच्या कामकाजाच्या वेळेत  व नियमात पुढील प्रमाणे बदल करण्यात येत असून यात आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार सकाळी ११ ते २ या वेळेत ग्राहका साठी सर्व व्यवहार सुरळीत पणे सुरू असतील तर प्रत्येक शनिवार व रविवार कामकाज संस्थेचे पूर्णपणे बंद असेल, पतसंस्थेच्या सर्व कर्मचारी वर्गास ओळखपत्र वापरणे बंधनकारक असेल तसेच प्रत्येक कर्मचाऱ्यांचे कोरोना प्रतिबंधित लसीकरण करून घेणे महत्वाचे असेल, गरज असेल तितकेच कर्मचारी कामावर बोलवावे त्यासोबत  जास्तीत जास्त व्यवहार हे ऑनलाइन पद्धतीने करण्याचा प्रयत्न करावा, परिसरात सोशल डिस्टनसीग नियमाचे काटेकोर पालन करावे व पतसंस्थेच्या परिसरात जागोजागी सॅनिटायझर ची व्यवस्था करावी वरील सर्व नियमांची अंमलबजावणी जिल्ह्यातील सर्व पतसंस्था प्रशासनाने  ३१ मे २०२१ पर्यन्त काटेकोर पणे करावी व त्यानंतर पुढे शासकीय नियमानुसार योग्य तो बदल करण्यात येईल अशी माहिती अध्यक्ष रविकाका बोरावके यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

COMMENTS