Homeताज्या बातम्यादेश

काँगे्रस खासदाराच्या घरी सापडली 351 कोटींची रोकड

प्राप्तीकर विभाग खोदणार खासदाराचे घर

नवी दिल्ली ः झारखंड राज्यातील काँगे्रसचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्या घरावर गेल्या काही दिवसांपूर्वी प्राप्तीकर विभागाने छापे टाकले असून,

भंडारा : मुरुम उत्खनन प्रकरणी मोहाडी तहसीलदारांनी केली कारवाई| LokNews24
आरबीआयच्या पथकाकडून ’नगर अर्बन’मध्ये तपासणी
कोर्टात विरोधात निकाल गेल्याच्या कारणावरून एकास मारहाण

नवी दिल्ली ः झारखंड राज्यातील काँगे्रसचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्या घरावर गेल्या काही दिवसांपूर्वी प्राप्तीकर विभागाने छापे टाकले असून, या छाप्यात तब्ल 351 कोटी रूपयांची रोकड सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून या रोकडची मोजदाद सुरू होती. इतकी मोठी रक्कम सापडल्यानंतरही धीरज साहू यांनी मोठा खजिना लपवल्याचा प्राप्तीकर विभागाला संशय आहे. त्यामुळे रांचीच्या रेडियम रोडवर असलेल्या धीरज साहू यांच्या घरात प्राप्तीकर विभागाचे पथक खोदकाम करण्याच्या तयारीत आहे. रोकड जप्त केल्यानंतर घरात खजिना लपवल्याचा संशय आहे, त्यामुळे आयकर विभागाकडून त्यादृष्टीने धीरज साहू यांची चौकशी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे जमिनीखाली सोन्याचे दागिने आणि इतर वस्तूंचा शोध घेतला जात आहे. जिओ सर्व्हिलन्स सिस्टिम मशीनद्वारे घराची झडती सुरू आहे. आयकर विभागाने धिरज साहू यांच्या ठिकाणांवर छापे टाकल्यानंतर धक्कादायक चित्र समोर आले होते. नोटांचे घबाड सापडले होते. रोख रक्कम इतकी होती की, नोटा मोजण्याचे यंत्रही बिघडल्याची माहिती होती.

COMMENTS