करोडी येथील शेतकऱ्यांच्या 350 पपईच्या झाडांचे अज्ञाताने केले नुकसान 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

करोडी येथील शेतकऱ्यांच्या 350 पपईच्या झाडांचे अज्ञाताने केले नुकसान 

 औरंगाबाद प्रतिनिधी - औरंगाबाद तालुक्यातील  करोडी येथील शेतकरी रामभाऊ धोंडीबा दवंडे यांच्या शेतातील 350 पपईचे झाडे अज्ञाताने तोडल्याची धक्कादायक घटन

लाळ्या खुरकूत आजाराचे थैमान, चार गाईंचा मृत्यू
राहाता तालुक्यातील गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल  
माहिती व जनसंपर्कच्या पुणे विभागीय प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

 औरंगाबाद प्रतिनिधी – औरंगाबाद तालुक्यातील  करोडी येथील शेतकरी रामभाऊ धोंडीबा दवंडे यांच्या शेतातील 350 पपईचे झाडे अज्ञाताने तोडल्याची धक्कादायक घटना आज उघड झाली असून या घटनेत शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. करोडी येथे गट नंबर 85 मध्ये रामभाऊ दवंडे यांची शेती आहे. काल परवालाच ग्रामपंचायतीचे निकाल लागले या निवडणुकीत रामभाऊ दवंडे या शेतकऱ्याच्या सुनबाई निवडून आल्या होत्या निवडणुकीचा राग मनात धरून  दुसऱ्या दिवशी अज्ञाताने रामभाऊ धोंडीबा दवंडे यांच्या शेतातील पपईचे 350 झाडे तोडुन त्यांचे नुकसान केले.  ही धक्कादायक घटना शेतकरी आज शेतामध्ये गेल्याने निदर्शनात आली अज्ञाता विरुद्ध दौलताबाद पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांनी गुन्हा दाखल केला.

COMMENTS