Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 रेल्वेचा धक्का बसून 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू 

अहमदनगर : रेल्वे मार्ग क्रॉसिंग करत असताना रेल्वे गाडीची धडक बसून एकाचा मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील देहरे गावात रात्री ८ वाजल्याच्या सुम

गोवंशीय जनावरांचे मांस विक्री करणार्‍या दुकानावर छापा
उद्योजक अजित सुरपुरिया यांचे निधन
डॉ.बाबुराव उपाध्ये, डॉ.शिवाजी काळे यांना साहित्य ज्योती पुरस्कार जाहीर

अहमदनगर : रेल्वे मार्ग क्रॉसिंग करत असताना रेल्वे गाडीची धडक बसून एकाचा मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील देहरे गावात रात्री ८ वाजल्याच्या सुमारास घडली प्रदीप रामदास पठारे (वय ३२, रा. देहरे, ता, नगर) असे मयताचे नाव आहे. पठारे हे देहरें व गावच्या शिवारात असलेल्या त्यांच्या शेतमळ्यात राहत होते. रविवारी रात्री आठच्या सुमारास मळ्यातून गावात येण्यासाठी ते रेल्वे मार्ग क्रॉसिंग करत असताना त्याच वेळी आलेल्या रेल्वे गाडीची त्यांना जोराची धडक बसल्याने ते गंभीररित्या जखमी झाले.त्यांना त्यांचे नातेवाईक नामदेव पठारे व इतरांनी उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालय उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथील मेडिकल ऑफिसर डॉ. बोठे यांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सी आर पी सी 174 प्रमाणे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

ही घटना नगर शिर्डी रोडचे काम करणाऱ्या मनीषा कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या बेजबाबदार पणामुळे घडली आहे. या कंपनीने देहरे गावात जाणारा पर्यायी पुलाखालून जाणारा मार्ग कुठलीही कल्पना न देता बंद केला.त्यामुळे या युवकाला रेल्वे मार्ग ओलांडावा लागला, यासाठी कंपनीचे,आलोक सिंग, व महेश मिश्रा तसेच इतर कर्मचारी त्यांच्यावर व कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देहरे ग्रामस्थांनी केली आहे.

COMMENTS