बिजापूर : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधातील मोहीम भारतीय सैनिकांनी तीव्र केली असून, रविवारी छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील बिजापूरच्या राष्ट्रीय

बिजापूर : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधातील मोहीम भारतीय सैनिकांनी तीव्र केली असून, रविवारी छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील बिजापूरच्या राष्ट्रीय उद्यान परिसरात नक्षलवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत तब्बल 31 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, दोन जवान शहीद झाले आहेत. तर इतर दोन जवान शहीद झाले आहेत. परिसरात शोध मोहीम सुरू असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसराला लागून असलेल्या तोडका जंगल परिसरात नक्षलवाद्यांचे दोन दलम लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा जवानांनी त्या परिसरात नक्षलविरोधी मोहीम राबविली. दरम्यान, लपून असलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू झाला. यावेळी जवानांनीही प्रत्युत्तर दिले. यात 31 नक्षलवादी ठार झाले. तर दोन जवान शहीद व दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना घटनास्थळावरून बाहेर काढण्यासाठी जगदलपूरहून एमआय 17 हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहे. बिजापूरमध्ये पंचायत समिती निवडणुका होत आहेत. नक्षलवादी या निवडणुकांवर प्रभाव टाकू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
COMMENTS