लातूर प्रतिनिधी - सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय व सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंद
लातूर प्रतिनिधी – सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय व सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात 31 जोडप्यांचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा सनई चौघडयाच्या सुरात व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला. या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख होते. याप्रसंगी उच्च न्यायालय मुंबईचे न्यायमूर्ती शिवकुमारजी डिगे, धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबईचे महेंद्र महाजन, धर्मादाय सहआयुक्त बी. डी. कुलकर्णी, धर्मादाय उपआयुक्त श्रीमती ही. का. शेळके, सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्रीमती पी.आर.निकम, माजी आमदार त्र्यंबक भिसे, धर्मा सोनकवडे, आबासाहेब पाटील, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळयाचे अध्यक्ष रमेश बियाणी, जगन्नाथ पाटील, अशोक भोसले, अशोक गोविंदपूरकर, देवीदास काळे, गोविंद घार, चंद्रकांत चिकटे संभाजी सूळ, संभाजी रेड्डी, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड, प्राचार्य डॉ. राजाराम पवार, यांची प्रमुख उपस्थिती होतीे. यावेळी धर्मादाय आयुक्त महाजन म्हणाले की, ज्याला दूरदृष्टी असते, तो समाज, राज्य, देश घडत असतो. आगदी तशाच पध्दतीने न्यायमूर्ती डिगे यांनी धर्मादाय आयुक्त असताना कार्यालयाचा चेहरा बदलला. गरीब कुटंंबांना अशा उपक्रमातून सर्वांना आर्थिक बळ मिळत आहे. अशा उपक्रमात संस्थाच नाहीतर मंदिर ट्रस्ट, गुरूद्वारे, सुवर्णकार आदी सहभागी होऊन उपक्रम पार पाडत आहेत. महाराष्ट्रातील 9 लाख 33 हजार ट्रस्ट वेगवेळया क्षेत्रात कार्यरत आहेत. दिव्यांगानाही याच माध्यमातून मदतीचा हातभार लावला जात आहे. म्हणून आज राज्यभरात धर्माधाय आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून सर्वधर्मीय सामूहिक विवाह पार पडत आहेत. न्यायमूर्ती डिगे म्हणाले की, लातूरचा आज सर्वच क्षेत्रात वेगळा पॅटर्न बनत आहे. गेल्या तीन महिण्यापासून तुम्ही सर्वांनी जे परिश्रम घेतले, त्यामुळे आज हा सर्वधर्मीय सामूहिक विवाह पार पडत आहे. विवाहसाठी कुटूंबाची आर्थिक परिस्थिती नाही म्हणून एका मुलीचा बाप आत्महत्या करतो. तर दुसरीकडे संस्था, ट्रस्ट यांच्याकडे कोटयावधी रूपये पडून आहेत. ही बाब धर्मादाय आयुक्त असताना जानवली आणि अशा स्वारूपाची सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळयाची संकल्पना पुढे आली. त्यामुळे आज राज्यात हजारो विवाह होत आहेत. संस्था, विश्वतांनी समाजातील दुख: कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हे सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळे हे चळवळ झाले पाहिजेत. समाजातील कोणालाही आपली मुलगी ओझं आहे, असे वाटता कामा नये. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगन्नाथ पाटील यांनी केले. सुत्रसंचालन बालाजी सुळ, प्रा. संदीप जगदाळे यांनी केले. आभार अशोक भोसले यांनी मानले. या कार्यक्रमास वधू-वरांकडील मंडळी मोठया प्रमाणात उपस्थित होती.
COMMENTS