नाशिक - महाराष्ट्रः भारतीय गुणवत्ता परीषदेचे दोन उपक्रम (क्युसीआय) द मिशन क्वालिटी सिटी आणि सरपंच संवाद आणि नाशिक जिल्हा परिषद यांच्या संयुक्
नाशिक – महाराष्ट्रः भारतीय गुणवत्ता परीषदेचे दोन उपक्रम (क्युसीआय) द मिशन क्वालिटी सिटी आणि सरपंच संवाद आणि नाशिक जिल्हा परिषद यांच्या संयुक्तविद्यमाने सरपंच कार्यशाळा आयोजीत केली आहे. याअंतर्गत प्रशिक्षण व गुणवत्ता विकास सत्रांचे आयोजन येत्या ५ मार्चला नाशिकमध्ये केले आहे. या उपक्रमात ३०० पेक्षा जास्त सरपंच सहभागी होणार असल्याची माहिती पत्रकार परीषदेतून दिली आहे.
या संयुक्त उपक्रमातून विकसीत भारत मोहिमेसाठी स्थानिक स्तरावर सक्षमीकरण व नेतृत्व विकासावर भर दिला जातो आहे. या कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या राज्यमंत्री माननीय डॉ.भारती पवार, नाशिकचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.दादाजी भुसे, नाशिक लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत गोडसे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
पत्रकार परीषदेप्रसंगी श्रीमती आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परीषद, नाशिक या म्हणाल्या, या प्रशिक्षण सत्रांचा उपयोग आमच्या सर्व सरपंचांना ज्ञानवर्धनासाठी होईल. तसेच स्थानिक स्तरावर शाश्वत विकास कशा पद्धतीने साधता येऊ शकतो, हेदेखील शिकायला मिळणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही स्थानिक नेतृत्व विकसीत करतांना त्यांच्या माध्यमातून बदल घडविण्याचा ध्यास ठेवलेला आहे. कार्यशाळेतून कौशल्ये, शिक्षण, आणि स्वच्छता अशा विविध संकल्पना निश्चित करण्यात आलेल्या आहेत. शहरी भागांकरिता राबविल्या जात असलेल्या मिशन क्वालिटी सिटीच्या धर्तीवर हा उपक्रम पार पडत आहे.
विविध सत्रांच्या माध्यमातून सहभागी सरपंचांना ज्ञान व कौशल्ये प्राप्त होतील. ज्यांचा उपयोग करुन आपल्या खेड्याचा शाश्वत विकास साध्याच्या दृष्टीने ते धेय्य निश्चिती व पुढील कार्यपद्धती ठरवू शकतील. उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करणे, संकल्पनेवर आधारित ग्राम सरपंच डेव्हलपमेंट प्लॅन अंमलबजावणीसाठी सहाय्यता मिळणार आहे.
जितेंद्र ठक्कर, कार्यकारणी सदस्य, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया म्हणाले, आमच्या संस्थेतर्फे भारतातील पंचायत राज व्यवस्थेला पाठबळ देते व सक्षम करण्यावर भर दिला जातो आहे. आमच्या या सत्रांच्या माध्यमातून सरपंचांना त्यांच्यासाठी उपयुक्त ज्ञान प्रदान करतांना खर्या अर्थाने सरपंच संवाद घडविला जाणार आहे. मिशन क्वालिटी सिटी नाशिकच्या सहकार्याने राबवत असलेल्या या उपक्रमातून नाशिक ग्रामीणमधील लोकांच्या जीवनावर परीणामकारक बदल घडतील असा आम्हाला विश्वास आहे.
क्युसीआयचे अध्यक्ष जॅक्सय शाह यांच्या नेतृत्वाखाली क्वालिटी सिटी मिशनने नाशिक व सभोवतालच्या परीसरात प्रभाव निर्माण केलेला आहे. जनसामान्यांना उपक्रमात सामावून घेतांना चळवळीसोबत ४८ संघटना, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संस्था जोडल्या गेल्या आहेत. सुमारे १,५०,००० शहरवासीयांनी सहभागी होतांना स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवितांना स्वच्छतेची शपथ घेतलेली आहे. त्याचप्रमाणे ५,००० शाळांतील विद्यार्थ्यांनीदेखील माननीय पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानात सहभागी होण्याची प्रतिज्ञा घेतलेली आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून ६,७७४ बांधकाम मजुरांचा कौशल्य विकास व प्रशिक्षण देणे. तसेच ६,९९६ कामगारांना कौशल्य विकासाचे उपक्रम राबविण्यात आलेले आहेत.
शहरी भागात काम करतांना महानगर पालिका क्षेत्रातील एकण सहा विभागांतून एकूण ३० सक्रिय नागरिकांच्या सहाय्यतेने स्थानिक स्तरावर सुधारणा घडविण्यावर भर दिला जातो आहे. तसेच झोपडपट्टीपासून तर शाळांपर्यंत वेगवेगळ्या स्तरापर्यंत पोहोचत परिवर्तन घडविला जातो आहे. मिलिंदनगर झोपडपट्टी असेल किंवा वेगवेगळ्या ३० शाळा यांमध्ये एनएबीईटीच्या सहकार्याने गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जाता आहेत. ब्लॅक स्पॉट हविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून, याद्वारे सर्व सहा विभागांमध्ये स्वच्छता प्रस्तापित केली जाते आहे. पथनाट्यांद्वारे जनजागृती, प्रशिक्षण उपक्रम व इतर विविध उपक्रमांतून मिशन क्वालिटी सिटीद्वारे शाश्वत विकासाच्या दृष्टीने नाशिकचे भविष्य घडविले जाते आहे. यावेळी हेमंत राठी, कुणाल पाटील उपस्थित होते.
COMMENTS