पुणे ः पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूकीत चोरट्यांनी 300 नागरिकांचे मोबाइल चोरून नेले. याप्रकरणी मध्यभागातील फरासखाना, विश्रामबाग, खडक, समर्थसह वेग

पुणे ः पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूकीत चोरट्यांनी 300 नागरिकांचे मोबाइल चोरून नेले. याप्रकरणी मध्यभागातील फरासखाना, विश्रामबाग, खडक, समर्थसह वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सर्वाधिक मोबाइल चोरीच्या घटना विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या असून, मुख्य मिरवणुक मार्गावर चोरट्यांनी 91 मोबाइल चोरले. फरासखाना पोलिसांनी मध्यप्रदेश आणि नाशिक येथील मोबाईल चोरांच्या टोळीतील दोघांना पकडून दोन लाख 79 हजाराचे 21 मोबाइल संच जप्त केले.
विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. सर्वाधिक गर्दी लक्ष्मी रस्त्यावर झाली होती. बेलबाग चौक ते लोकमान्य टिळक चौकात मोबाइल चोरीच्या सर्वाधिक घटना घडल्या. उत्सवाच्या कालवधीत दहा दिवसात मध्यभागातून 25 मोबाईल चोरीच्या घटनांची नोंद पोलिसांनी केली. विसर्जन मिरवणुकीत सर्वाधिक मोबाइल चोरीच्या घटना घडल्या. मोबाइल, तसेच दागिने चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी साध्या वेशातील पथके तैनात केली होती, तसेच ध्वनीवर्धकावरुन पोलिसांनी मोबाइल, दागिने चोरांपासून सावध रहा, असे आवाहन केले होते.
COMMENTS