Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बद्रीनाथ-केदारनाथ चारधाम यात्रेसाठी नाशिकहून 3 हजार भाविक जाणार

चौधरी यात्रा कपनीतर्फे यात्रेचे आयोजन

नाशिक : संपुर्ण भारतीयांचे लक्ष लागून असलेल्या उत्तराखंडातील चारधाम यात्रेतील मुख्य केदारनाथाचे कपाट मुख्यमंत्री पुष्कर सिंह यांच्या हस्ते विधीवत

शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा मिळणार अंडी आणि केळी
गणेशोत्सव मंडळांना दिलासा
जमात-ए-इस्लामी हिंद बीडच्या वतीने मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांना निवेदन

नाशिक : संपुर्ण भारतीयांचे लक्ष लागून असलेल्या उत्तराखंडातील चारधाम यात्रेतील मुख्य केदारनाथाचे कपाट मुख्यमंत्री पुष्कर सिंह यांच्या हस्ते विधीवत पुर्जाअर्चा करून खोलण्यात आले. यावेळी ढोलताशांच्या तालावर नाचणार्‍या भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. देशभरातील हजारो भाविक या विशेष क्षणाचे साक्षीदार झाले.  नाशिकहून चौधरी यात्रा कंपनीतर्फे 23 एप्रिल 2023 रोजी पहिली तुकडी चारधाम यात्रेसाठी रवाना झाल्याची  माहिती चौधरी यात्रा कंपनी प्रा.लि.चे संचालक सत्यनारायण चौधरी व रामगोपाल चौधरी यांनी दिली.

उत्तरखंडातील कठीण समजल्या जाणार्‍या बद्रीनाथ-केदारनाथ-गंगोत्री – यमुनोत्री यात्रेसाठी 3 हजाराहून अधिक यात्रेकरूंनी सहभाग नोंदविला आहे.

गेल्या वर्षाच्या तुलतेन या वर्षी यात्रेकरूंचा उत्साह वाढला असून चारधाम यात्रेसाठी जाणार्‍यांची संख्याही त्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 23 एप्रिल 2023 ते आँक्टोबर 2023 पर्यंत सुरु असलेल्या या यात्रेसाठी तब्बल 3 हजाराहून अधिक यात्रेकरूंनी चौधरी यात्रा कंपनीच्या 42 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.

त्याचबरोबर शिमला-कुलू-मनाली, काश्मीर-वैष्णोदेवी, दार्जिलिंग-गंगटोक, महाराष्ट्र दर्शन, गुजरात दर्शन, काशी-अलाहाबाद, दक्षिणभारत -रामेश्वर या सहलींना प्रवाशांचा प्रतिसाद अधिक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS