Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिकमध्ये मोबाईलचा स्फोट होऊन 3 जण जखमी

नाशिक प्रतिनिधी - नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या उत्तमनगर मध्ये मोबाईलचा भीषण स्फोट होवून ३ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी

1 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत कृषी प्रक्रिया जागृती पंधरवडा आयोजन
महिला बचतगटांना व्यापाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचे संपूर्ण पाठबळ – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
सरकारी कर्मचारी आजपासून संपावर

नाशिक प्रतिनिधी – नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या उत्तमनगर मध्ये मोबाईलचा भीषण स्फोट होवून ३ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत सविस्तर माहिती अशी की, चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना नाशिकमधून उघडकीस आली आहे. शहरातील उत्तमनगर परिसरात सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या स्फोटामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले असून जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. तुषार जगताप, बाळकृष्ण सुतार आणि शोभा जगताप अशी जखमींची नावे आहेत. हा मोबाईल स्फोट इतका भीषण होता की घराचे मोठे नुकसान झाले असून आजूबाजूच्या घरांच्याही काचा फुटल्यायाबाबतची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे. स्फोट कसा झाला याबाबत अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरातील नागरिंकामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

COMMENTS