वर्धा/प्रतिनिधी ः ऐन रक्षाबंधनाच्या दिवशीच मंदिरावर झेंडा लावण्यासाठी गेलेल्या 3 जणांचा विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वर्धा

वर्धा/प्रतिनिधी ः ऐन रक्षाबंधनाच्या दिवशीच मंदिरावर झेंडा लावण्यासाठी गेलेल्या 3 जणांचा विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वर्धा जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, वर्ध्याच्या पिपरी मेघे गावात बुधवारी सकाळी 8 च्या सुमारास ही घटना घडली. अशोक सावरकर(55), बाळू शेर (60) व सुरेश झिले (33) अशी मृतांची नावे आहेत. हे तिन्ही तरुण गावातील तुळजाभवानीच्या मंदिरावर झेंडा लावण्यासाठी चढले होते.
मंदिराच्या झेंड्याचा खांब जवळपास 25 फूट उंच होता. मंदिरावर झेंडा लावताना अचानक खांब कलंडला आणि शेजारून जाणार्या 33 केव्ही विजेच्या तारेवर पडला. यामुळे अशोक सावरकर, बाळू शेर व सुरेश झिले या तिघांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. ते तिघेही मंदिराच्या शेडवर पडले. 3 पैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने गावात हर्षोल्हासाचे वातावरण होते. त्यात सकाळीच ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे अवघ्या गावावर शोककळा पसरली आहे.
COMMENTS