Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पांढरी येथे पायाभूत सुविधांसाठी 3 कोटींचा निधी

लातूर प्रतिनिधी - रेणापूर तालुक्यामधील पांढरी (खरोळा) येथील श्री विठ्ठल आणि श्री केशव महाराज देवस्थानात पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी ल

अखेर तळोदा परिसरातील बिबट्या जेरबंद
राज्यात गँगवार करणारे सत्तेत नको
रूपाली बोराडे पाटील यांना बेस्ट ड्रेस डिझायनर अवार्ड

लातूर प्रतिनिधी – रेणापूर तालुक्यामधील पांढरी (खरोळा) येथील श्री विठ्ठल आणि श्री केशव महाराज देवस्थानात पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी राज्य सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून यासाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याबद्दल ग्रामस्थांनी आमदार धिरज देशमुख यांचे शनिवारी आभार मानले.
लातूर ग्रामीण मतदारसंघात विविध विकास कामे मंजूर करून आणण्यासाठी आमदार धिरज देशमुख हे सातत्याने प्रयत्नशील आहेत त्यामुळेच प्रादेशिक विकास योजना सन 2022-23 अंतर्गत नवीन कामांना मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासाठी आमदार धिरज देशमुख यांनी राज्याचे पर्यटन आणि कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांना पत्र पाठवून त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता. श्री विठ्ठल आणि श्री केशव देवस्थानात पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला असून यातून विविध विकास कामे मार्गी लागणार आहेत. याबद्दल आमदार धिरज देशमुख यांनी मंगलप्रभात लोढा यांचे आभार मानले.

COMMENTS