Homeताज्या बातम्याशहरं

25 वर्षाच्या युवतीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून

कराड / प्रतिनिधी : युवतीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली. कार्वे ते कोरेगाव मार्गावर ही घटना घडली. मृत युवतीची अद्याप

वन हदीतील लेंडीखत विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणार l LokNews24
कापूसखेडमध्ये कन्येची सशस्त्र सीमा दलात निवड
सातारा जिल्ह्यात आरटीई अंतर्गत 1,483 विद्यार्थ्यांचे प्रवेश

कराड / प्रतिनिधी : युवतीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली. कार्वे ते कोरेगाव मार्गावर ही घटना घडली. मृत युवतीची अद्याप ओळख पटली नाही. घटनास्थळी पोलीस पोहोचले असून पंचनामा सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडालीय.
कार्वे ते कोरेगाव रस्त्यावर भैरोबा मंदिराशेजारील शेतात सकाळी युवतीचा मृतदेह पडलेला आढळून आला. तेथून जाणार्‍यांना तो दिसताच याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलीस त्वरित घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिसराची पहाणी केली. त्यावेळी सुमारे पंचवीस वर्षीय युवतीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून झाल्याचे स्पष्ट झाले. घटनने परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून युवतीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
पोलिसांनी सांगितले की, कार्वे ते कोरेगाव मार्गावर भैरोबा मंदिर आहे. या नजीक उसाच्या शेतात युवतीचा डोक्यात निर्घृण खून झाला. घटनेची माहिती मिळताच तालुक्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, फौजदार भैरवनाथ कांबळे, भरत पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. युवतीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

COMMENTS