केज प्रतिनिधी - पावसाळा संपत आला तरी अजुन देखील पिका योग्य पाऊस पडला नसुन भुरभुरीच्या पावसावर पेरणी केलेली पिके ऐन फुलाच्या बहरात आहेत. आणी पाउस

केज प्रतिनिधी – पावसाळा संपत आला तरी अजुन देखील पिका योग्य पाऊस पडला नसुन भुरभुरीच्या पावसावर पेरणी केलेली पिके ऐन फुलाच्या बहरात आहेत. आणी पाउस मात्र पडत नसल्याने आता हाता तोंडाशी आलेला घास जाणार हे जवळपास निश्चित समजले जात असल्याने शेतकरी राजा चिंतेत आहे.दुष्काळ सदृश्य परिस्थितीची लक्षणे जाणवत असल्याने शेतकर्यांनी भरलेल्या पिक विम्याचा 25 टक्के अग्रीम तात्काळ मंजूर करून सदरील रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी छावा संघटना जिल्हाध्यक्ष शिवाजी दादा ठोंबरे यांनी केली आहे.या बाबत अधिक माहिती अशी की, संपुर्ण राज्यासह बीड जिल्ह्यात मृग नक्षत्रा पासुन आजपर्यंत मोठा पाउस पडला नाही. भुरभरी पावसावर शेतकर्यांनी काळ्या आईची ओटी भरली.या वर्षी केज तालुक्यात सोयाबीन पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली असून अधुन मधून होणार्या थुईथुई पावसाने ही पिके चांगली आली होती.सध्या ही पिके ऐन फुलाच्या बहरात असतानाच पावसाने ओढ दिली आहे.आणी तप्त पडणार्या ऊन्हात कोवळी पिके करपू लागली दिवसा ऊन आणी रात्री टिपुर चांदणे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.तर काही शेतकरी थोड्या फार प्रमाणावर पाणी असणार्या पिकाला तुषारने पाणी सोडुन भिजवत असले तरी सर्व क्षेत्र भिजत नाही.आणी पाऊसही पडत नाही. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेत असल्याने आणी पावसाचे दिवस संपत आल्याने दुष्काळ पडतो की काय ? अशी चिंता बळीराजाला सतावु लागली आहे.त्यामुळे त्यांनी भरलेला पिक विमा त्याचा 25 टक्के अग्रीम पिक विमा शासनाने तात्काळ मंजूर करुन सदरील रक्कम शेतकर्यां च्या खात्यावर वर्ग करावी. अशी मागणी छावा मराठा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी दादा ठोंबरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
COMMENTS