Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरडवाहूला एकरी 25 तर बागायतीला 50 हजारांची मदत द्या

काँगे्रस नेते नाना पटोले यांची राज्यपालांकडे मागणी

मुंबई ः लोकसभा निवडणुका पार पडल्या असल्या तरी शेतकर्‍यांचे प्रश्‍न तसेच प्रलंबित आहेत. याप्रकरणी राज्यपाल महोदयांनी या प्रश्‍नी लक्ष घालून जनतेला

परमवीर सिंग यांनी सरकार पाडण्यासाठी केलेल्या मदतीची; पटोलेंचा सरकारवर गंभीर आरोप
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा ः नाना पटोले
मी मुख्यमंत्री व्हावे ही कार्यकर्त्यांची इच्छा

मुंबई ः लोकसभा निवडणुका पार पडल्या असल्या तरी शेतकर्‍यांचे प्रश्‍न तसेच प्रलंबित आहेत. याप्रकरणी राज्यपाल महोदयांनी या प्रश्‍नी लक्ष घालून जनतेला मदत देण्यासाठी पुढाकार घ्यावा. शेतकर्‍यांची अवस्था पाहता कोरडवाहू शेतीला एकरी 25 हजार रुपये, बागायती शेतीला एकरी 50 हजार रुपये तसेच फळबागांना एकरी 1 लाख रुपये मदत तातडीने द्यावी, अशी मागणी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.
जनावरांसाठी चारा छावण्या सुरु कराव्यात व पिण्याच्या पाण्याची सोय करावी. खरीपाच्या पेरणीसाठी खते आणि बियाणे सरकारने पुरवावे अशी मागणी करत दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारला निर्देश द्यावेत अशी मागणी देखील पटोले यांनी केली आहे. निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, राज्यातील जनता सध्या भीषण दुष्काळाचा सामना करत आहे. जवळपास 10 हजारांपेक्षा जास्त गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहेत. आजही हजारो वाड्या-वस्ता पिण्याचे पाणी व जनावरांच्या चार्‍यांपासून वंचित आहेत. शेतकरी संकटात आहे. हंडाभर पाण्यासाठी माता भगिनींना पायपीट करावी लागत आहे. धरणामधील पाणी साठ्याने तळ गाठला आहे. मुंबईसह अनेक शहराच्या पाणी पुरवण्यातही कपात केली जात आहे. पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट आहे. शेतीला पाणी मिळणेही दुरापास्त झाले आहे. शेतक-यांनी आपल्या पोटच्या लेकराप्रमाणे वर्षानुवर्षे सांभाळलेल्या फळबागा वाळून गेल्या आहेत. शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. संपूर्ण राज्यातील जनता अत्यंत अडचणींचा सामना करत आहे. दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत करावी अशी मागणी विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत पण राज्य सरकार मात्र अजगरासारखे सुस्त पडून आहे. राज्यातील जनता दुष्काळाने होरपळत असतानाही सत्ताधारी पक्ष त्याकडे फारसे गांभिर्याने पाहत नाही, हे अत्यंत दुर्देवी आहे. राज्य सरकारने केवळ आढावा बैठक घेण्याचे सोपस्कार पार पाडले आहेत. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला अनेक पालकमंत्री गैरहजर होते त्यामुळे सरकारला दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य नाही हे स्पष्ट झाले आहे.

संसद भवन परिसरात महापुरुषांची पुतळे पुर्नस्थापित करा – संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान असणारे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संसद भवन परिसरातील पुतळे केंद्र सरकारने हटवले आहेत, हे अत्यंत दुर्देवी आणि निषेधार्ह आहे. सरकारने तात्काळ हे पुतळे पुर्नस्थापीत करावेत अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.

COMMENTS