Homeताज्या बातम्यादेश

थंडीचा कहर, कानपुरात 25 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः देशभरात थंडीचा कहर असून, गेल्या काही दिवसांपासून थंडीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर भारतात तर तापमान मोठया प्रमाणावर घ

रघुनाथ अभंग यांचे निधन
निश्चित ध्येय प्राप्तीसाठी परिश्रमात सातत्य आवश्यक-पोलीस अधीक्षक डॉ.सोमय मुंडे
 सरकारच्या मरणाचं तोरण विधानभवनाच्या प्रवेशद्वाराला बांधलेलं आहे – आ. अमोल मिटकरी 

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः देशभरात थंडीचा कहर असून, गेल्या काही दिवसांपासून थंडीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर भारतात तर तापमान मोठया प्रमाणावर घटले आहे. कानपूरमध्ये रात्रीचे तापमान 3.2 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. त्यामुळे दोन सरकारी रुग्णालयात हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकमुळे 25 जणांना जीव गमवावा लागला. कार्डिओलॉजीच्या ओपीडीमध्ये रुग्णांची संख्या जास्त राहिली.
लक्ष्मीपत सिंघानिया हृदयरोग संस्थेचे संचालक डॉ.विनय कृष्णा यांनी सांगितले की, हृदयविकाराच्या समस्या घेऊन 723 रुग्ण आले होते. त्यापैकी 41 रुग्णांना दाखल करुन घेतले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच 15 रुग्णांचा मृत्यू झाला. त्याचवेळी उपचारादरम्यान 7 रुग्णांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, उन्नावच्या 65 वर्षीय संध्या, कल्याणपूरच्या 74 वर्षीय राजोल आणि हलत हॉस्पिटलमध्ये आणलेल्या कन्नौजच्या 70 वर्षीय झाकीर यांचा ब्रेन स्ट्रोकमुळे मृत्यू झाला आहे. राजस्थान -6 अंश तापमानाने गारठून गेले आहे. तर शिमला-नैनितालपेक्षा जास्त थंडी ही दिल्लीत पडत आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज तापमान 1.8 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत थंडी हवेमुळे आँरेज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागानुसार 7 जानेवारीपासून डोंगराळ भागात पुन्हा बर्फवृष्टी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर भारतातील मैदानी भागात तापमानात आणखी घसरण होऊ शकते, त्यामुळे थंडी वाढणार आहे

COMMENTS