Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हरियाणा निवडणुकीत 25 लाख मतचेारी :राहुल गांधी

नवी दिल्ली : काँगे्रस नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांनी सातत्याने भाजप आणि निवडणूक आयोगावर टीकेची राळ उडवलेली असतांनाच पुन्हा

शेतीच्या पिकांची मशागत नव्या उमेदीने सुरू
आयुष्याचा अंतिम हेतू समाधान हाच आहे – डॉ. संजय कळमकर
 उध्दव ठाकरेंनी सर्वात पहिले संजय राऊतचं डोकं तपासून घ्यायला पाहिजे- मंत्री अब्दुल सत्तार 

नवी दिल्ली : काँगे्रस नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांनी सातत्याने भाजप आणि निवडणूक आयोगावर टीकेची राळ उडवलेली असतांनाच पुन्हा एकदा बुधवारी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन 2024 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत तब्बल 25 लाख मतांची चोरी झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. विशेष म्हणजे या राज्यात केवळ 2 कोटी मतदार आहेत.
आकडेवारीचा हवाला देत राहुल गांधी यांनी सांगितले की, हरियाणामध्ये 25 लाख 41 हजार 144 मते बनावट आहेत. यामध्ये 5 लाख 21 हजार 619 डुप्लिकेट मतदार, 93 हजार 174 अवैध पत्ते आणि 19 लाख 26 हजार 351 मोठ्या प्रमाणात मतदारांचा समावेश आहे. शिवाय, फॉर्म 6 (नावांची भर) आणि फॉर्म 7 (नावांची वगळणे) यांचाही मोठ्या प्रमाणात गैरवापर झाला होता, परंतु निवडणूक आयोगाने आता या डेटाचा वापर रोखला आहे. र

ब्राझीलच्या मॉडेलचे हरियाणा निवडणुकीत मतदान
ब्राझिलियन मॉडेलचा फोटो दाखवत काँग्रेस नेत्याने दावा केला की, हरियाणातील विविध मतदान केंद्रांवर वेगवेगळ्या नावांनी 22 वेळा मतदान करण्यासाठी हाच फोटो वापरण्यात आला. ते म्हणाले की, ही मॉडेल कधी सीमा, कधी सरस्वती आणि कधी स्वीटी असे सूचीबद्ध होते. तर हरियाणातील दोन मतदान केंद्रांवर एकाच महिलेचा फोटोची 223 वेळा पुनरावृत्ती झाल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. शशांक गिरी नावाच्या व्यक्तीने 431 आणि 508 या बूथवर 14 वेळा मतदान केल्याचा आरोप आहे, तर रुद्रभिषेक जैन आणि नमन जैन नावाच्या दोन भावांनी 130 आणि 131 या बूथवर 18 वेळा मतदान केले.

COMMENTS