Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जमीन खरेदी विक्री व्यवहारात दिलीप सातपुते यांची 25 लाखाला फसवणूक

सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर : जमीन खरेदीदारास कोणतीही पूर्व सूचना न देता जमीन विक्री करणाऱ्या चौघांनी त्यांच्यात झालेले साठेखत रद्द न करतां, तसेच साठेखत पोटी दिलेली

शेतकऱ्यांनी केली होती गांज्याची शेती… पोलिसांनी टाकली धाड…
सर्व शासकीय रुग्‍णालय आणि आरोग्‍य केंद्रात लसीकरणाच्‍या सुविधा मोफत : डॉ. ज्‍योती मांडगे
राज्यात शनिवार, रविवारी लॉकडाऊन

अहमदनगर : जमीन खरेदीदारास कोणतीही पूर्व सूचना न देता जमीन विक्री करणाऱ्या चौघांनी त्यांच्यात झालेले साठेखत रद्द न करतां, तसेच साठेखत पोटी दिलेली 25 लाख रुपये घेऊन विश्वासघात करुन त्या जमिनीची अन्य खरेदीदाराला विकून फसवणूक केल्याची घटना घडली. ही घटना दुय्यम निबंधक कार्यालय येथे घडली.

या बाबतची माहिती अशी की दिलीप नानाभाऊ सातपुते (रा. भूषणनगर केडगाव अ.नगर) यानी सन २०१४ मध्ये त्यांचें भाऊ अशोक आणि विठ्ठल यांच्यात मिळून शेतजमीन घेण्याचे ठरवले.त्यांना मौजे कामरगाव येथील नागरे यांची गट क्र.६९६ मधील १९ एकर पैकी १५ एकर जमीन अंकुश जयवंत नागरे, जालिंदर जयवंत नागरे, गजेंद्र बाळासाहेब नागरे (रा.गेवराई, जि. बीड) हे विक्रीस तयार असल्याने त्यांच्यात झालेल्या बैठकीत जमिनीचा व्यवहार १ कोटी ५७ लाख ६५ हजार रुपयास  देण्याचे ठरले. त्या व्यवहरापोटी. दिलीप सातपुते यांनी त्यांच्या भावासह वेळोवेळी रोख व चेकने 25 लाख रुपये दिले.दरम्यान नागरे यांचे ऑक्टोंबर २०२२ रोजी सातपुते हे नागरे यांना वेळोवेळी जमीन खरेदी देऊन टाका असे म्हणत होते. परंतू नागरे हे काहीतरी सबब सांगून खरेदी देण्याची जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत होते.

त्यानंतर १२ एप्रिल २०२४ रोजी सातपुते यांना समजले की अंकुश नागरे, जालिंदर नागरे, आणि गजेंद्र नागरे यांनी ती शेत जमीन सातपुते याना कोणतीही पूर्व सूचना न देता,त्यांच्यात झालेले साठेखत रद्द न करता , तसेच सातपुते यांनी साठेखत पोटी दिलेली २५ लाख रुपये घेऊन त्यांचा विश्वासघात केला. नागरे यांनी 3 एप्रिल २०२४ रोजी ती जमीन राकेशकुमार सिंग (रा. अर्जुन पार्क, श्रध्दा विहार,इंदिरानगर,नाशिक) यांचें ज.मु. म्हणून अंकुश बाळू ठोकळ (रा. कामरगाव, ता.नगर) याना विकून सातपुते यांनी २५ लाख रुपये रकमेची फसवणूक केली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी दिलीप सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अंकुश नागरे, जालिंदर नागरे, गजेंद्र नागरे यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम ४०६ ,३४ अन्वये फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद केली.

COMMENTS