नवी दिल्ली : भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे 25 विमानतळ भाडेतत्वावर देण्यासाठी निर्धारित करण्यात आलेत. राष्ट्रीय मुद्रीकरण प्रक्रियेनुसार भारतीय विमा
नवी दिल्ली : भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे 25 विमानतळ भाडेतत्वावर देण्यासाठी निर्धारित करण्यात आलेत. राष्ट्रीय मुद्रीकरण प्रक्रियेनुसार भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे 25 विमानतळ वर्ष 2022 ते 2025 दरम्यान भाडेतत्वावर देण्यासाठी निर्धारित केले गेले आहेत. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे राज्यमंत्री जनरल व्ही के सिंग यांनी राज्यसभेत दिलेल्या एका लिखित उत्तरात ही माहिती दिली.
राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांच्या उत्तरात नमूद केल्यानुसार प्राधिकरणाने दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, गुवाहाटी, जयपूर, लखनौ, मंगळुरु व तिरुवनंथपुरम हे आठ विमानतळ सार्वजनिक-खाजगी भागीदारीत कार्यान्वयन, व्यवस्थापन व विकासासाठी दीर्घ मुदतीच्या भाडेतत्वावर दिले आहेत. यापैकी दिल्ली व मुंबईचे विमानतळ 2006 साली हस्तांतरित केले गेले होते. गेल्या 5 वर्षांत म्हणजे 2017-18 पासून 2021-22 पर्यंत प्राधिकरणाला दिल्ली विमानतळातून 5500 कोटी रुपये आणि मुंबई विमानतळाकडून 5174 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. नुकतेच सार्वजनिक – खाजगी भागीदारीत चालवायला दिलेले 6 विमानतळ पुढीलप्रमाणे : मंगळुरु – 31 ऑक्टोबर 2020, लखनौ- 2 नोव्हेंबर 2020, अहमदाबाद- 7 नोव्हेंबर 2020, गुवाहाटी- 8 ऑक्टोबर 2021, जयपूर- 11 ऑक्टोबर 2021 आणि तिरुवनंतपूरम- 14 ऑक्टोबर 2021 प्राधिकरणाला या 6 विमानतळांकडून फेब्रुवारी 2023 पर्यंत सुमारे 896 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. शिवाय, प्राधिकरणाने या विमानतळांसाठी केलेल्या भांडवली खर्चापोटी सुमारे 2349 कोटी रुपयांचे थेट शुल्क प्राधिकरणाला प्राप्त झाले आहे. या सार्वजनिक -खाजगी भागीदारीच्या प्रक्रियेत, म्हणजे मार्च 2018 पासून ते विमानतळ खाजगी चालक भागीदाराला हस्तांतरित करेपर्यंत, प्राधिकरणाने या 6 विमानतळांवर 1970 कोटी रुपयांचा भांडवली खर्च केला होता. खाजगी चालक भागीदारांनी हा भांडवली खर्च प्राधिकरणाला चुकता केल्याचे सिंग यांनी आपल्या उत्तरात नमूद केले.
COMMENTS