Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्रापुरात एका दिवसात भरला २४७ वाहन चालकांनी दंड

वाहन चालकांकडून चार लाखांची वसुली तर चार लाखांची सूट

 शिक्रापूर - शिरुर पोलीस स्टेशन येथे वाहन चालकांच्या वाहनावरील दंड निम्मी सुट देऊन भरण्यासाठी न्याय आपले दारी संकल्पनेतून राष्ट्रीय लोकअदालत साठी

संगमनेरमध्ये गोवंश कत्तलखान्यावर छापा
शिवरायांची तलवार कोणत्या जाती-धर्माविरुध्द नव्हती : श्रीमंत कोकाटे
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा पतीने केला दगडाने ठेचून खून I LOKNews24

 शिक्रापूर – शिरुर पोलीस स्टेशन येथे वाहन चालकांच्या वाहनावरील दंड निम्मी सुट देऊन भरण्यासाठी न्याय आपले दारी संकल्पनेतून राष्ट्रीय लोकअदालत साठी जिल्हा हेल्प डेस्क उपक्रम आयोजित करत वाहन चालकांसाठी आयोजित उपक्रमात एकाच दिवसात २४७ वाहन चालकांनी आपल्या वाहनांवरील दंड भरला असता एकाच दिवसात तब्बल चार लाख रुपयांची विक्रमी वसुली झाली आहे.

                     शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन येथे न्याय आपले दारी संकल्पनेतून राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करत नागरिकांना त्यांच्या वाहनांवरील दंड भरण्यामध्ये पन्नास टक्के सुट दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते, यावेळी आयोजित जिल्हा हेल्प डेस्क उपक्रम प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बागल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास बांबले, पोलीस हवालदार गणेश शेंडे, पोलीस नाईक मिलिंद देवरे, योगेश कांबळे अमित गोजारी, प्रकाश कुकडे, जिल्हा न्यायालय लिपिक रोहन दिवे, आदित्य कोकणे, आकाश कोलते उपस्थित होते, दरम्यान नागरिकांच्या वाहनांवरील दंड पन्नास टक्के भरुन सदर दंडाची पावती लोकआदलत मध्ये मांडून वाहन चालकांना पन्नास टक्के सुट देण्यात येणार असल्याने अनेकांनी दंड भरण्यासाठी गर्दी केलेली असताना एका दिवसात २४७ वाहन चालकांनी आपल्या वाहनांवरील दंड भरला असता तब्बल चार लाख रुपयांची विक्रमी वसुली झाली असून वाहन चालकांना चार लाखांची सूट मिळाली आहे तर अनेक वाहन चालकांचा वेळ तसेच दंडातील रकमेत सूट मिळवण्यासाठी न्याय आपले दारी संकल्पनेतील राष्ट्रीय लोकअदालत साठी चा सदर जिल्हा हेल्प डेस्क उपक्रलाचा नागरिकांनी लाभ घेणे गरजेचे असल्याचे वाहतूक पोलीस मिलिंद देवरे यांनी सांगितले.

COMMENTS