Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर 234 कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासन व केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेका

कोपरगाव विधानसभेची निवडणूक होणार रंगतदार
बीड पुन्हा हादरले! ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार | LOKNews24
निविदा मार्गाद्वारे नजीकच्या काळात मोठ्या रेल्वे बनावटीच्या वॅगन व्हील ऑर्डरची हिल्टन मेटल फोर्जिंगला अपेक्षा 

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासन व केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण 234 कोटी 49 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितले.
राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. 15 ऑक्टोबर ते 01 नोव्हेंबर 2024 पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल अ‍ॅपवर एकूण 2062 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 2059 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल अ‍ॅप हे कोणत्याही अ‍ॅप स्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या पद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

COMMENTS