Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पवईत 23 वर्षीय एअर हॉस्टेसची हत्या

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबईतील पवई परिसरामध्ये एका एअर हॉस्टेसची हत्या झाल्याची घटना समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या तरूणीची हत्या नेमकी कोणत्या का

दर्ग्याच्या आवारात धारधार शस्त्राने वार करून दोघांची हत्या
निर्घृण हत्येने यवतमाळ शहर हादरलं (Video)
बारामतीमध्ये कोयता व कुर्‍हाडीने विद्यार्थ्याची हत्या

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबईतील पवई परिसरामध्ये एका एअर हॉस्टेसची हत्या झाल्याची घटना समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या तरूणीची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, याचा शोध पोलिस घेत आहे. रूपल ओग्रे असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मरोळ येथील राहत्या या एअर हॉस्टेसचा मृतदेह सापडला आहे. तरुणीची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. रूपल ओगे्र ही मुळची रायपूरची आहे. मरोळ येथील एनजी कॉम्पलेक्स येथे ती राहत होती. बहीण आणि तिच्या मित्रासोबत ती एकाच फ्लॅटमध्ये राहत होती. मात्र दोघेही सध्या गावी गेले होते. रुपलचे घरचे तिला फोन करत होते, मात्र ती फोन उचलत नसल्याने घरच्यांना तिच्या मित्राला याबाबत माहिती दिली. त्यावेळी मित्र तिच्या घरी पोहोचला, तेव्हा दरवाजा ठोकूनही कुणीही दरवाजा उघडला नाही. दरवाजा तोडला त्यावेळी घटनेची माहिती समोर आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पवई पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी झाले आणि पुढील तपास सुरु केला आहे.
तिचा गळा धारदार शस्त्राने चिरला होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. प्रथमदर्शनी, डॉक्टरांनी लैंगिक अत्याचाराबाबत कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करण्यात येत आहे, असे अधिकार्‍याने सांगितले. रविवारी सकाळी तिचे कुटुंबीयांशी शेवटचे बोलणे झाले होते. त्यामुळे दुपारी तिची हत्या झाली असावी, असे अधिकार्‍यांनी सांगितले. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मारेकर्‍याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली आहेत. रूपलच्या सदनिकेत कोण आले होते, हे जाणून घेण्यासाठी पोलीस सीसी टीव्ही कॅमेर्‍यातील चित्रणाची तपासणी करीत आहेत. स्थानिक पोलिसांबरोबरच गुन्हे शाखेचे अधिकारीही समांतर तपास करीत आहेत.

पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात – मुंबईतील पवई परिसरात 23 वर्षीय एअर हॉस्टेसची हत्या झाल्याची घटना समोर आली होती. मुंबई पोलिसांना अवघ्या काही तासात या घटनेचा उलगडा केला आहे. पवई पोलिसांनी या हत्येप्रकरणी इमारतीत सफाईच काम करणार्‍या व्यक्तीला अटक केली आहे.

COMMENTS