मुंबई ः ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केदारनाथ धाममध्ये तब्बल 228 किलो सोन्याचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप सोमवारी के

मुंबई ः ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केदारनाथ धाममध्ये तब्बल 228 किलो सोन्याचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप सोमवारी केला आहे. त्यांनी सोमवारी मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानावरून निघाल्यानंतर हा आरोप केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
माध्यमांशी बोलतांना शंकराचार्य यांना विचारले की, दिल्लीमध्ये केदारनाथ धाम सारखे मंदिर बनवले जात आहे. यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे ? यावर शंकराचार्यांनी म्हटले की, द्वादश ज्योतिर्लिंगांची एक परिभाषा आणि नियम निश्चित आहेत. त्यामुळे कोठेही केदारनाथ धाम बनवला जाऊ शकत नाही. शंकराचार्यांनी म्हटले की, शास्त्रांमध्ये द्वादश ज्योतिर्लिंगाचे वर्णय केले आहे. केदारनाथ धाम दिल्लीत बनवला जाईल, असे म्हणणे चुकीचे आहे. आमच्या धार्मिक स्थळांमध्ये राजकारणाचा प्रवेश झाला आहे. हे चुकीचे आहे. केदारनाथ धाममध्ये 228 किलो सोन्याचा घोटाळा झाला आहे. याचा तपास का होत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शंकराचार्यांनी यावेळी अनंत अंबानी यांच्या विवाह समारंभात पंतप्रधान मोदींची भेट झाल्याचे म्हटले. त्यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला प्रणाम केला, मीही त्यांना आशीर्वाद दिला. आम्ही त्यांचे शत्रू नाही तर हितचिंतक आहे. जेव्हा ते चुकीचे करतात तेव्हा आम्ही स्पष्ट सांगतो की, येथे चूक झाली आहे. शंकराचार्यांनी म्हटले की, शास्त्रांमध्ये लिहिले आहे की, सोमनाथ सौराष्ट्र म्हणजे गुजरातमध्ये असेल. केदारनाथ हिमालयात असेल. याला कोणता पर्याय असू शकत नाही. जर आम्ही हे दिल्लीत बनवण्याचा प्रयत्न करू तर ते चुकीचे होईल. केदारनाथ एकच आहे व जेथे आहे, तेथेच राहील. शंकराचार्यांनी म्हटले की, केदारनाथमध्ये सोन्याचा घोटाळा झाला आहे. यावर का आवाज उठवला जात नाही? तेथे घोटाळा केल्यानंतर आता दिल्लीत केदारनाथ बनत आहे? आता आणखी एक घोटाळा होईल. गेल्यावर्षी केदारनाथ धामच्या एका पुजार्याने आरोप केला होता की, 125 कोटी रुपयांच्या सोन्याचा घोटाळा झाला आहे. हे सोने मंदिरावर चढवले जाणार होते. मात्र त्याजागी तांब्याचा वापर केला गेला. मात्र या आरोपांचे मंदिर समितीने खंडन केले होते. आज पुन्हा असे आरोप शंकराचार्यांनी लावले आहेत. त्यांनी म्हटले की, केदारनाथमधून 228 किलो सोने गायब आहे. यासाठी कोण जबाबदार आहे. गेल्या बुधवारी दिल्लीतील बुराडी येथे केदारनाथ मंदिराचे भूमिपूजन केले होते. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उपस्थित होते. याच्या विरोधात केदारनाथ धाममधील पुजार्यांनी आंदोलन केले होते.
COMMENTS