Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खडकवासलातून 22 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

पुणे ः पुणे शहर व परिसरात पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे खडकवासला धरणाच्या सांडव्यावरुन मुठा नदीपात्र

जिल्हास्तरीय तलवार बाजी स्पर्धेत रोहमारे महाविद्यालयाच्या खेळाडूंचा विजय
ससून रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वॉर्ड
वसईत एटीएम मशीन लुटण्याचा प्रयत्न फसला

पुणे ः पुणे शहर व परिसरात पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे खडकवासला धरणाच्या सांडव्यावरुन मुठा नदीपात्रात होणारा विर्सग सोमवारी सकाळी 22 हजार 880 क्युसेक करण्यात आला. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार हा विर्सग कमी-जास्त करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरु नये, असे आवाहन कालवा पाटबंधारे उपविभागाने केले आहे. अतिपर्जन्यमानामुळे पानशेत धरणाच्या सांडव्यावरुन होणारा विर्सग 15 हजार 136 क्युसेक करण्यात आला.

COMMENTS