Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर कल्याण रोड वरुन २१ वर्षीय महिला बेपत्ता 

अहमदनगर : घरात कोणाला काही एक न सांगता २१ वर्षीय विवाहित महिला कोठेतरी निघून गेली. ती अद्याप घरी परतली नाही. ही घटना बालाजी मंदीराचे पाठीमागे, वि

आगीत नऊ माणसांसह चार जनावर होरपळले
राहुरी शहरात शांतता राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे : पालकमंत्री विखे
मंत्री टोपे व डॉ. पोखरणा यांच्यावर गुन्हे दाखल करा : प्रवीण दरेकर | DAINIK LOKMNTHAN

अहमदनगर : घरात कोणाला काही एक न सांगता २१ वर्षीय विवाहित महिला कोठेतरी निघून गेली. ती अद्याप घरी परतली नाही. ही घटना बालाजी मंदीराचे पाठीमागे, विनकर सोसायटी, शिवाजीनगर, कल्याण रोड, अ.नगर येथे घडली. तिचा तिच्या घरच्यांनी नगर शहर, नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती कोठेही मिळून आली नाही. या प्रकरणी सुनिल सोपान लांडगे, (वय 52 वर्षे, रा.बालाजी मंदीराचे पाठीमागे, विनकर सोसायटी, शिवाजीनगर, कल्याण रोड, अहमदनगर ) यांनी दिलेल्या माहितीनुसार कोतवाली पोलिसांनी हरवल्याची नोंद केली. अधिक तपास पोलिस हवालदार संदीप पितळे करीत आहे.

मिसींग व्यक्ती नाव वर्णन असे आहे .  नाव सौ. विद्या पंकज मदने, वय 21 वर्षे, रा. साकुरी शिव, शिर्डी, ता. राहाता, जिल्हा अहमदनगर, हल्ली रा. बालाजी मंदीराचे पाठीमागे, विनकर सोसायटी, शिवाजीनगर, कल्याण रोड, अ.नगर, वर्ण सावळा, केस काळे लांब, शरीरयष्टी सडपातळ उंची 155 सेमी, अंगात पंजाबी, डोळे  काळे, नंबरचा गोल आकाराचा चष्मा, कान  मध्यम, कानात कर्णफुले, गळ्यात दोन पळ्या असलेले मंगळसुत्र. सोबत एक मोबाईल असे आहे.

COMMENTS