Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी एकास 20 वर्षाची सक्त मजूरी

शिराळा / प्रतिनिधी : बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या रोहित तुकाराम जाधव (वय 27, रा. चिंचोली, ता. शिराळा) यास येथील जिल्हा सत्

माण तालुक्यात नवजात अर्भकास फेकून दिल्याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल
दिल्ली विमानतळावर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी l DAINIK LOKMNTHAN
आटपाडी तालुक्यातील समन्यायी पाणी वाटपाचे सादरीकरण

शिराळा / प्रतिनिधी : बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या रोहित तुकाराम जाधव (वय 27, रा. चिंचोली, ता. शिराळा) यास येथील जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरविले. त्याला 20 वर्ष सक्त मजूरीची शिक्षा सुनावली.
आरोपी रोहित याच्या विरोधात कोकरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सपोनि ज्ञानदेव वाघ यांनी या प्रकरणाचा तपास करून येथील न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. जिल्हा न्यायाधीश जे. एम. परदेशी यांच्या समोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. शुभांगी पाटील यांनी युक्तीवाद केला.

COMMENTS