लातूर प्रतिनिधी - पेंडखजूर भरलेली पिकअप अज्ञात व्यक्तीने चोरून नेली होता. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच गांधी चौकच्या पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्

लातूर प्रतिनिधी – पेंडखजूर भरलेली पिकअप अज्ञात व्यक्तीने चोरून नेली होता. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच गांधी चौकच्या पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत चोरीस गेलेल्या पिकअपसह 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. लातूर जिल्ह्यातील 2 गुन्ह्यांसह तुळजापूर येथील एक चोरीचा गुन्हा पोलिसांनी उघड केला आहे. पेंडखजूर भरलेली पिकअप गाडी दि. 14 जूनच्या मध्यरात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने सम्राट चौक परिसरातून चोरून नेल्यावरून गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा झाला होता. सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांच्या नेतृत्वात गुन्ह्यातील आरोपीच्या शोधासाठी पोलिस ठाण्याचे पथक तयार करण्यात आले.
पथकास माहिती मिळाली की, सम्राट चौक येथून चोरीस गेलेली बोलेरो पिकअप वाहन वासनगाव शिवारात वैराग ते सोलापूर जाणा-या रोडवर एका हॉटेलच्या बाजूला लपवून ठेवल्याची माहिती मिळताच सदर पथकाने वासनगाव शिवारात पोहोचून तपासणी केली असता गुन्ह्यात चोरीस गेलेली पिकअप तीच असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने सदर ठिकाणी सापळा लावला. थोड्याच वेळात त्या पिकअपमध्ये बसताना पथकाने एकास थांबवून त्याच्याकडे विचारपूस केली असता तो अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने काल रात्री सम्राट चौक परिसरातून सदरचे पिकअप वाहन चोरी केल्याचे सांगून पोलिस ठाणे शिवाजीनगर व पोलिस ठाणे तुळजापूर येथूनही चारचाकी वाहन चोरल्याचे सांगून त्याने लपवून ठेवलेली वाहने दाखवून दिल्याने पोलिस ठाणे शिवाजीनगरच्या हद्दीतून चोरलेली बोलेरो जीप व पोलिस ठाणे तुळजापूर हद्दीतून चोरलेली टाटा सुमो अशी 3 वाहने किंमत 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपास पथकातील पोलिस अधिकारी, अंमलदार यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने मिळालेल्या माहितीचा बारकाईने अभ्यास व विश्लेषण करून गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल 24 तासांत जप्त केला आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलिस ठाणे गांधी चौकचे पोलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक आक्रम मोमीन, पोलिस अंमलदार दामोदर मुळे, राजेंद्र टेकाळे, रणवीर देशमुख, दत्ता शिंदे, शिवाजी पाटील यांनी केली आहे.
COMMENTS