Homeताज्या बातम्यादेश

वैष्णोदेवीच्या मार्गावर दरड कोसळून 2 महिलांचा मृत्यू

नवी दिल्ली ः देशभर पावसाचा धुमाकूळ सुरू असून, अनेक राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांचा मृत्यू झाला आह

वीरभद्र ट्रस्टच्या अध्यक्षपदी निधाने तर, उपाध्यक्षपदी बोठे
एकविरा देवी, राजगडावल लवकरच रोप वे
कुर्ल्यात तरुणीवर बलात्कार करून हत्या प्रकरण आरोपींना 6 डिसेंबर पर्यंत पोलीस कस्टडी | LOKNews24

नवी दिल्ली ः देशभर पावसाचा धुमाकूळ सुरू असून, अनेक राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यातच जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील माता वैष्णोदेवी मंदिराच्या नवीन मार्गावर दरड कोसळून तीन यात्रेकरू गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. एका मुलीवर उपचार सुरू आहेत. अधिकार्‍यांनी सांगितले की, दुपारी 2.35 च्या सुमारास पंचीजवळ भूस्खलन झाले. माती पडल्याने रस्त्याच्या वर बांधलेले टिनचे शेड कोसळले. अनेक जण याला बळी पडले. दुसरीकडे आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुरामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही राज्यांमध्ये 99 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. 54 ट्रेन वळवण्यात आल्या आहेत. येथे अनेक नद्यांना उधाण आले आहे. एनडीआरएफच्या 26 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले 1998 नंतर असा पूर आला आहे. 17 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. विजयवाड्यात परिस्थिती सर्वात वाईट आहे. येथील काही भागात 10 फुटांपर्यंत पाणी आहे. शहरातील 2.76 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे.

COMMENTS