Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातील आश्रमात 2 हजार कोटींचा घोटाळा

ओशो आश्रमाच्या विश्‍वस्तांवर गंभीर आरोप

पुणे/प्रतिनिधी ः अध्यात्मिक गुरू आचार्य ओशो रजनीश यांची 33 वी पुण्यतिथी. यानिमित्त ओशो यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून ओशो भक्त पुण्यातील कोरे

पाठीत खंजीर खुपसणार्‍यांनी पूजा न करण्याची नैतिकता पाळावी
पूर्ण राज्याच्या मागणीसाठी लडाखमध्ये मोर्चा
इच्छामरणाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याचे ‘सर्वोच्च’ संकेत

पुणे/प्रतिनिधी ः अध्यात्मिक गुरू आचार्य ओशो रजनीश यांची 33 वी पुण्यतिथी. यानिमित्त ओशो यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून ओशो भक्त पुण्यातील कोरेगाव परिसरातील ओशो आश्रम येथे दाखल झाले आहेत. मात्र, भक्तांना ओशो इंटरशॅनल फाऊंडेशन या आश्रम प्रशासनाकडून समाधीस्थळी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे भक्तांनी आता आंदोलन सुरु केले आहे. अशातच गोवा येथील ओशो भक्त स्वामी ध्यान अमीन ऊर्फ मनोज झा यांनी ओशो आश्रम प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
ओशो आश्रमच्या ट्रस्टींनी दोन हजार कोटीं रुपयांचा घोटाळा केला आहे, असा आरोप मनोज झा यांनी केला आहे. तसेच, याबाबत ईडी, सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. मनोज झा यांनी सांगितले की, पुण्यातील ओशो आश्रम समाधीस्थळ भक्तांसाठी महत्त्वपूर्ण आहे. 160 देशातून याठिकाणी दररोज दोन हजारच्या आसपास भक्त येतात. त्यामुळे या भागात मोठी आर्थिक उलाढाल होऊन राज्यास परदेशी पैसे मिळत होते. परंतु सध्या विदेशात बसलेले आश्रमाचे विश्‍वस्त ओशो आश्रमचे महत्त्व कमी करत आहेत. याठिकाणची एक जमीन बजाज समूहाला 107 कोटी रुपयात विक्री केली. मनोज झा यांनी सांगितले की, पुणे आश्रमात भक्तांना समाधीस्थळी जाण्यापासून रोखल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात याचिकेमार्फेत दाद मागण्यात आली होती. न्यायालयाने त्यानुसार समाधीस्थळ घोषित करुन भक्तांना दर्शनास जाऊ देण्यास सांगितले. परंतु, सध्या समाधी दर्शनास जाण्याकरिता 970 रुपये अर्ध्या तासाकरिता आकारले आहे. भक्तांचा याठिकाणाचा वावर कमी करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे.

COMMENTS