पूर व अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी संतप्त शेतकऱ्यांचा बालमटाकळी येथे २ तास रास्ता रोको आंदोलन….!

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पूर व अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी संतप्त शेतकऱ्यांचा बालमटाकळी येथे २ तास रास्ता रोको आंदोलन….!

शेवगाव ता.प्रतिनिधीदि. १५/१२/२०२१पूर व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या तसेच अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीची नुकसान भरपाई

अहमदनगर जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये अकरा डिसेंबर रोजी लोकअदालत
बाबासाहेब भोस यांची शरद पवार गटात घरवापसीचे संकेत
लाभांश देण्याची परंपरा याहीवर्षी अबाधित : आ.काळे

शेवगाव ता.प्रतिनिधीदि. १५/१२/२०२१
पूर व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या तसेच अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीची नुकसान भरपाई अनुदान रक्कम तात्काळ जमा करावी तसेच बालमटाकळी, लाडजळगाव, बाडगव्हाण, हातगाव, सुळेपिंपळगाव, दिवटे, प्रभूवाडगाव, पिंगेवाडी, गोळेगाव, शेकटे खुर्द यासह ४६  गावांना शासनाकडून अद्यापही कुठल्याही प्रकारची शासकीय नुकसान भरपाई मिळालेली नसून ही गावे शासनाच्या मदतीपासून आजतागायत वंचित राहिलेले असून या शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई न मिळाल्याने या परिसरातील शेतकरी हा मेटाकुटीला आला आहे. त्यांना तात्काळ शासनाकडून नुकसानभरपाई अनुदान देण्यात यावे. या प्रमुख मागणीसाठी शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दि. १५ डिसेंबर २०२१ रोजी शेवगाव-गेवराई महामार्गावर बालमटाकळी येथे परिसरातील असंख्य शेतकऱ्यासह दोन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान महसुल विभागाचे बोधेगाव येथील मंडलाधिकारी भाऊसाहेब खुडे तसेच आंदोलक यांच्यात चर्चा होऊन श्री खुडे यांनी आश्वासन दिल्याने सदरील रास्ता रोको आंदोलन हे मागे घेण्यात आले. या आंदोलनामध्ये शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे, ज्ञानेश्वर कारखान्याचे माजी संचालक मोहनराव देशमुख आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान शेतकरी देखील या आंदोलन दरम्यान आक्रमक झाल्याचे दिसून आले होते. आंदोलन दरम्यान शेवगाव-गेवराई महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या त्यामुळे प्रवाशांना देखील या आंदोलनाचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला. यावेळी शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे, ज्ञानेश्वर कारखान्याचे माजी संचालक मोहनराव देशमुख, बालमटाकळी सेवा संस्थेचे व्हाईस चेअरमन भास्करराव बामदळे, बाळासाहेब देशमुख, हरीचंद्र घाडगे, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ केसभट, भानुदास गलधर, संदिप देशमुख, प्रवीण देशमुख, बाळासाहेब जाधव, अनिल परदेशी, माणिक कवडे, धनंजय देशमुख, विक्रम बारवकर, किरण बागडे, सामाजिक कार्यकर्ते रोहिदास भोंगले, भीमराव पाटेकर, भाजपाचे ओबीसी मोर्चाचे जिल्हा चिटणीस किरण पाथरकर, माणिकराव शिंदे, मगबुल शेख, दिलीप गरुड, अशोक वैद्य, बबनराव लोणकर, रामप्रसाद वैद्य, दस्तगिर शेख, विजय कांकरिया, बाळासाहेब दोडके, महादेव कडूळे, रंगनाथ गोर्डे, दिपक देशमुख, नशीर शेख, दिगंबर भिसे, जनार्धन काळे, अमोल बामदळे, किशोर वाघूम्बरे, सुदाम शिंदे, मकबूल शेख, काका भाकरे, सोमनाथ सौन्दर, नारायण राजपुरे, रंगनाथ वैद्य, कचरू बावणे, पांडुरंग वैद्य, विठ्ठल सौन्दर यांच्यासह परिसरातील असंख्य शेतकरी बांधव या रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच महसुल विभागाचे मंडलाधिकारी भाऊसाहेब खुडे, तलाठी बाबासाहेब अंधारे, कृषी विभागाचे कृषी सहाय्यक गजानन चव्हाण, कृषी सहाय्यक गणेश पवार, किशोर वाबळे, पोलीस प्रशासनाचे बोधेगाव दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भगवान बडधे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश गायकवाड, वासुदेव डमाळे आदिंनी आंदोलनस्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता.

COMMENTS