कर्जतच्या भूमी अभिलेख कार्यालयातील २ कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जतच्या भूमी अभिलेख कार्यालयातील २ कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात

कर्जत प्रतिनिधी : कर्जतच्या भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अटक करण्यात आली आहे. २० ह

गौरी शुगर कारखाना जिल्ह्यातील उच्चांकी भाव देणार : बोत्रे पाटील
खाजगी सावकाराच्या जाचास कंटाळून हाँटेल चालकाचे पलायन
’राष्ट्रवादी’च्या कर्जत तालुकाध्यक्षपदी अशोकराव जायभाय

कर्जत प्रतिनिधी : कर्जतच्या भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अटक करण्यात आली आहे. २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने मुख्यालय सहाय्यक सुनिल झिप्रू नागरे, वय : ४८, वर्ग : ३, रा. भैलुमे चाळ, शिवपार्वती मंगल कार्यालयाजवळ, कर्जत व भूकरमापक कमलाकर वसंत पवार, वय : ५२, वर्ग : ३, रा. प्लॉट नं. ५८, शारदा मंगल कार्यालयाशेजारी, शाहूनगर, केडगाव अहमदनगर या दोघांवर ही कारवाई करण्यात आली आहे. अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
कर्जत तालुक्यातील आंबिजळगाव येथील तक्रारदार यांची पत्नी व इतर दोघांच्या जमिनीची भुमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणी करण्यात आली होती. मोजणीनुसार तिन्ही खातेदार यांचे पोट हिस्से करून हद्दीच्या खुणा दर्शविण्यासाठी दोघा आरोपींनी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार होती.  तडजोडी अंती २० हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य केले. त्यावरून ३ मार्च २०२२ रोजी भूमी अभिलेख कार्यालय, कर्जत येथे केलेल्या लाचेच्या सापळा कारवाईत सुनिल नागरे याने पंचांसमक्ष तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारली. या कारवाईत दोन्ही लाचखोर कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते.
 पर्यवेक्षण अधिकारी म्हणून अहमदनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांनी काम पाहिले. पथकामध्ये पोलीस नाईक रमेश चौधरी, पोलीस अंमलदार वैभव पांढरे, रविंद्र निमसे, चालक पोलीस हवालदार हरून शेख, राहुल डोळसे यांचा समावेश होता.

COMMENTS