Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री गजानन नागरी सहकारी बँकेला 2 कोटी 24 लाखाचा नफा

बीड प्रतिनिधी - सर्वांना आपलं मानणारी आपली बँक या दृढ विश्वासाने 149 कोटी रूपये व्यवसाय असलेल्या श्री गजानन नागरी सहकारी बँकेला मार्च 2023 अखेर 2

श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
सुझलॉन कंपनीचे टॉवरची कॉपर वायर चोरणारा एक अटक, दोन पसार.     
काळे परिवाराने रयतलाच आपले कुटुंब मानले ः चैतालीताई काळे

बीड प्रतिनिधी – सर्वांना आपलं मानणारी आपली बँक या दृढ विश्वासाने 149 कोटी रूपये व्यवसाय असलेल्या श्री गजानन नागरी सहकारी बँकेला मार्च 2023 अखेर 2 कोटी 24 लाख 22 हजाराचा ढोबळ नफा झाला असुन करपुर्व नफा रू. 1 कोटी 30 हजाराचा झाला आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी एम. आर. क्षीरसागर, सरव्यवस्थापक डॉ. एम. एस. शेख यांनी दिली.


बँकेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री जयदत्त (आण्णा) क्षीरसागर यांचे नियोजनबध्द निर्णय व अभ्यासु मार्गदर्शन लाभले आहे. तसेच बँकेचे उपाध्यक्ष जगदीश काळे व संचालक मंडळाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.बँकेची मार्च 2023 अखेर वित्तीय स्थितीमध्ये भाग भांडवल 4 कोटी 16 लाख रूपये, राखीव व इतर निधी 15 कोटी 87 लाख रूपये, नेटवर्थ 16 कोटी 34 लाख, ठेवी 89 कोटी 44 लाख, कर्जे 60 कोटी 40 लाख, सी.डी. रेशो 67.53 टक्के, ग्रॉस एनपीए 2.37 टक्के, नेट एनपीए शुन्य टक्के, नफा 2 कोटी 24 लाख, भांडवल प्राप्त रेशो 33.27 टक्के खेळते भाग भांडवल 111 कोटी 98 लाख आहे. तसेच बँकेचा अ‍ॅव्हरेज बोरविंग रेट  5.81 टक्के व अ‍ॅव्हरेज लेंडींग रेट 10.18 टक्के असुन वाढावा 4.37 टक्के आहे. रिझर्व्ह बँकेचे सर्व नॉर्मस् पुर्ण करीत आहे. बँकेच्या 1)नवगण कॉलेज रोड शाखा, 2) जुना मोंढा बीड शाखा, 3)पेठ बीड शाखा व 4) नेकनुर शाखा, 5) रायमोह शाखा, 6) चौसाळा शाखा असुन 7) मुख्य शाखा, सागर हाईटस् बीड येथे आहे. या सात शाखांना ग्राहकांचा प्रतिसाद चांगला असून बँकेचे एकुण ग्राहक संख्या 28724 एवढी आहे. बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारच्या सेवा देत आहे. सदर सेवेपासुन ग्राहक बँकेचे समाधान व्यक्त करीत आहे. गत वर्षी श्री गजानन नागरी सहकारी बँकेला दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशनकडून 100 कोटीपर्यंत ठेवी असलेल्या युनिट बँका गटातुन दिला जाणारा महाराष्ट्र राज्यातुन सर्वोत्कृष्ट बँक -2022 प्रथम  पुरस्कार बँकेला मिळाला आहे. रिझर्व्ह बँकेचे सर्व नॉर्मस् पुर्ण केल्यामुळे 1) पिंपळनेर -शाखा, 2) शिरूर (कासार) – शाखा 3) छत्रपती संभाजीनगर – शाखा या तीन नवीन शाखेंना रिझर्व्ह बँकेने मंजुरी दिली आहे. येत्या काही दिवसात या तिन्ही शाखा त्या- त्या परिसरातील लोकांच्या सेवेत सक्रिय होतील.या तिन्ही शाखेचे काम प्रगती पथावर आहे. या यशात बँकेचे अध्यक्ष जयदत्त (आण्णा) क्षीरसागर, उपाध्यक्ष जगदीश काळे यांचे व सर्व संचालक मंडळ तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी एम.आर.क्षीरसागर व बँकेचे सरव्यवस्थापक डॉ.एम.एस.शेख, सहा.व्यवस्थापक व्ही.एल.कुंबेफळकर व वसुली अधिकारी के.ए.लांडे यांच्यासह इतर सर्व कर्मचारी व पिग्मी एजंट यांचे मोलाचे योगदान आहे.

COMMENTS