Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सभामंडपावर झाड कोसळून ७ भाविक ठार ; ५ गंभीर, ४० जखमी

अकोला प्रतिनिधी - अकोला शहरातील पारस परिसरातील बाबूजी महाराज मंदिरात आरती सुरू असतानाच टिनशेडवर झाड कोसळून आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याची

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबुत करण्यासाठी तालुका, शहराध्यक्षाची निवड लवकरच -हरिहर भोसीकर
महापारेषणच्या यंत्रणेत बिघाड; पिंपळे सौदागर,सांगवी, रहाटणीमध्ये विजेचे चक्राकार भारनियमन
‘वंचित’चा ‘मविआ’सोबत अधिकृत काडीमोड

अकोला प्रतिनिधी – अकोला शहरातील पारस परिसरातील बाबूजी महाराज मंदिरात आरती सुरू असतानाच टिनशेडवर झाड कोसळून आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे हे झाड कोसळलं आणि टिनशेडखाली थांबलेले 40 ते 50 जण दबले गेले. तर या घटनेत 8 जण गंभीर जखमी आहेत. अकोला जिल्ह्यात ९ एप्रिल रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. दरम्यान अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या पारस गावात बाबूजी महाराज संस्थान या संस्थांनमध्ये आरती सुरू होती. मंदिराच्या परिसरात असलेल्या टिनाच्या शेड खाली दर्शनासाठी तसेच पावसापासून आपला बचाव करण्यासाठी रस्त्यावरील वाहन धारक असे एकत्रित ४५ पेक्षा अधिक लोक उपस्थित होते. अचानक यादरम्यान मंदिराला लागून असलेलं भल मोठं कडूलिंबाचे झाड अचानक उन्मळून टिनाच्या शेडवर कोसळले. शेड खाली असलेले सर्व लोक या खाली दबल्या गेले. या घटनेत आतापर्यंत ७ लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. तर काही लोकांना सुखरूप बाहेर काढून वाचवण्यात आले आहे. यातील काही लोकांना हात-पायाला गंभीर दुखापत झाली असून जखमींचा आकडा २५ आहे.

COMMENTS