अयोध्येत कचरा कुंडीत आढळले १८ हँड ग्रेनेड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अयोध्येत कचरा कुंडीत आढळले १८ हँड ग्रेनेड

अयोध्या : उत्तरप्रदेशातील अयोध्या येथील डोगरा कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातील निर्मली कुंड चौकातील नाल्याजवळ 18 हातबॉम्ब(हँड ग्रेनेड) सापडलेत.एका तरुणान

महापारेषणकडून आशादीप विशेष मुलांच्या शाळेस मदत
Ahmednagar : वीज पंप सुरू करण्याच्या वादातून तरुणाची हत्या | LOKNews24
Solapur : करमाळा टेंभुर्णी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

अयोध्या : उत्तरप्रदेशातील अयोध्या येथील डोगरा कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातील निर्मली कुंड चौकातील नाल्याजवळ 18 हातबॉम्ब(हँड ग्रेनेड) सापडलेत.एका तरुणाने याची माहिती दिल्यानंतर मिलिटरी इंटेलिजन्स टीम घटनास्थळावर पोहोचली. यावेळी त्यांना झाडाझुडपांमध्ये हे हातबॉम्ब पडलेले दिसले. सुदैवाने या सर्व ग्रेनेडच्या पिना काढल्याने मोठा अनर्थ टळला. रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येत ज्याठिकाणी 18 हातबॉम्ब आढळले, तो संपूर्ण परिसर लष्कराच्या देखरेखीखाली असतो. रात्री 10 वाजल्यानंतर येथे काही हालचाली करण्यासही बंदी असते. या ठिकाणापासून अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर हँडग्रेनेडचा सराव करणारे लष्कराचे केंद्र आहे. अशा स्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणात हातबॉम्ब मिळाल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

COMMENTS