Homeताज्या बातम्यादेश

रेल्वेपूल कोसळून 17 कामगारांचा मृत्यू

मिझोराम राज्यातील घटना ; अनेक जण दबल्याची भीती

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः मिझोराम राज्यामध्ये निर्माणाधीन रेल्वे पूल कोसळून 17 कामगारांचा मृत्यू झाला आहे. या पुलाखाली आणखी अनेकजण अडकल्याची भीती व्

नाल्यात पडून 15 वर्षांची मुलगी गेली वाहून.
अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
अजित पवारांच्या पाठपुराव्यानंतर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांचा प्रश्‍न लागला मार्गी

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः मिझोराम राज्यामध्ये निर्माणाधीन रेल्वे पूल कोसळून 17 कामगारांचा मृत्यू झाला आहे. या पुलाखाली आणखी अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. पूल कोसळ्याची माहिती माहिती मिळातच एनडीआरएफ पथकासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू केले आहे. मिझोरमची राजधानी आयजोल पासून 21 किमी अंतरावर असलेल्या सायरंगमध्ये हा अपघात झाला.
घटनेच्या वेळी पुलावर 35 ते 40 मजूर काम करत होते. बैराबी ते सायरंग जोडणार्‍या कुरुंग नदीवर हा पूल बांधला जात होता. प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. तिसर्‍या आणि चौथ्या खांबामधील गर्डर 341 फूट पडला. पुलामध्ये एकूण 4 खांब आहेत. तिसर्‍या आणि चौथ्या खांबामधला गर्डर खाली पडल्याने हा अपघात झाला. या गर्डरनर हे सर्व मजूर काम करत होते. जमिनीपासून पुलाची उंची 104 मीटर म्हणजेच 341 फूट आहे. म्हणजेच पुलाची उंची कुतुबमिनारपेक्षा जास्त आहे. पूल कोसळल्याने बैराबी आणि सायरांग क्षेत्राचा संपर्कच तुटला आहे.  हा निर्माणाधीन पूल मिझोरामची राजधानी एझॉलपासून सुमारे 20-21 किलोमीटर दूर आहे. नॉर्थ ईस्ट फ्रंटीयर रेल्वेचे प्रमुख जनसंपर्क अधिकारी सब्यासाची डे यांनी या घटनेची माहिती दिली. या दुर्घटनेची माहिती मिळताच अधिकारी तात्काळ घटनास्थळी रवाना झाले आहेत. मदतकार्य सुरू असून जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले जात आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आल्याचे डे यांनी सांगितले. रेल्वे पुलाचे काम सुरू होते. मात्र, हा पूल तयार असताना आणि त्यावरून रेल्वे जात असताना ही दुर्घटना घडली असती तर या परिसरात मृत्यूचे तांडव निर्माण झाले असते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. तर, बांधकाम सुरू असतांनाच पूल कोसळल्याने पुलाच्या बांधकामावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पूलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे बांधले जात होते, त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचेही सांगितले जात आहे. मिझोरामचे मुख्यमंत्री जोरम थांगा यांनी ट्विट करून या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. सायरांग येथे एक निर्माणाधीन पूल कोसळला आहे. त्यामुळे 17 मजुरांचा मृत्यू झाला आहे. मृताच्या कुटुंबीयांप्रती संवेदना आहे. जखमी लवकर बरे व्हावेत याची प्रार्थना करतो, असे थांगा यांनी म्हटले आहे.

COMMENTS