ठाणे / प्रतिनिधी : ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्री 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यापूर्वी 10 ऑगस्ट र
ठाणे / प्रतिनिधी : ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्री 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यापूर्वी 10 ऑगस्ट रोजी याच रुग्णालयात 5 रुग्णांचा मृत्यू झाला होता. यानंतर यावरून बराच गदारोळ झाला. आता 17 रुग्णांच्या मृत्यूमुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. कारण आठवडाभरात 22 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान, घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन सरकारने रुग्णाचे मृत्यू कशामुळे झाले असल्याबाबतचे अहवाल मागविण्यात आले आहेत. त्यानंतर दोषींवर कारवाई करण्याचे संकेत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिले. तसेच या प्रकाराने शिवसेनेचा ठाकरे गट व मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्री 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना धक्का बसला आहे. रुग्णालय प्रशासनाने उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे. मृतांमध्ये आयसीयूमधील 12 रुग्णे, जनरल वॉर्डमधील 2 रुग्ण, कॅज्युअल्टीमध्ये 2 व बालरोग विभागातील 1 रुग्ण दगावला आहे.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना धक्कादायक आहे. डॉक्टरांची अपुरी संख्या, अपुरी सामुग्री आदी कारणांमुळे या घटना घडत असल्याचे स्थानिक सांगत आहेत. ही अतिशय गंभीर आणि दुर्दैवी बाब आहे. याकडे मुख्यमंत्री, ठाणे महापालिका आणि आरोग्यमंत्री महोदयांनी वैयक्तिक लक्ष देऊन सकारात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
10 ऑगस्ट रोजी 5 रुग्णांचा मृत्यू झाला
यापूर्वी 10 ऑगस्टच्या रात्री याच रुग्णालयात 5 रुग्णांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचार्यांची मोठी कमतरता असल्याने उपचाराअभावी या सर्वांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. मृतांमध्ये एका 80 वर्षीय रुग्णाचाही समावेश होता. यानंतर आ. जितेंद्र आव्हाड यांनी अधिकार्यांना झापले होते.
COMMENTS