बीड ः बीडमध्ये मराठा आरक्षणा दरम्यान उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी बीड पोलिसांनी 66 गुन्हे दाखल केले असून, आतापर्यंत 160 आरोपींना अटक करण्यात आली आहे
बीड ः बीडमध्ये मराठा आरक्षणा दरम्यान उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी बीड पोलिसांनी 66 गुन्हे दाखल केले असून, आतापर्यंत 160 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेत जवळपास 2 हजार जणांची चौकशी केली असून साडेपाचशे आरोपींची ओळख पटली आहे. त्यांचा देखील शोध सुरू असल्याचक पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले आहे. या प्रकरणाचे पोलिसांना 200 हून अधिक व्हिडिओ प्राप्त झालले असून यातून आरोपींचा शोध घेतला जात आहे. तर विशेष 8 पथके या प्रकरणाचा तपास करीत आहे. या घटनेत कोणत्याही आरोपीची जात-पात न बघता, त्यांना अटक केली जाणार असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले. तर या दरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई आरोपींकडूनच केली जाणार आहे. या आंदोलनादरम्यान संतप्त जमावाने आमदार प्रकाश सोळुंके आणि संदीप क्षीरसागर यांचे घर पेटवून दिले होते. याचबरोबर माजलगाव नगरपरिषदेच्या इमरातीला देखील आग लावण्यात आली. आंदोलनाला लागलेले हिंसक वळण आता या प्रकरणातील आरोपींना महागात पडणार आहे. सुमारे 11 कोटी रुपयांची वसुली या आरोपींकडून करण्यात येणार आहे. बीडच्या माजलगाव शहरात झालेल्या हिंसाचारात अकरा कोटी रुपयांचे नुकसान झाले. या सर्व नुकसानीची वसुली या प्रकरणातील अरोपींकडून केली जाणार असून तसा अहवाल तयार होत आहे. आरोपींनी ही भरपाई न दिल्यास त्यांच्या वैयक्तिक मालमत्ता जप्त करुन वसुली होईल, अशी माहिती बीडचे पोलिस अधीक्षक ठाकूर यांनी दिली आहे. आतापर्यंत बीडमध्ये हिंसाचार आणि जाळपोळ करणार्या 160 आरोपींना अटक करण्यात आली असून दोन हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर, पोलिसांकडून अन्य आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.
COMMENTS