बीड । प्रतिनिधीसमाजप्रबोधन, स्वच्छता, व्यसनमुक्ती आणि सामाजिक समतेचा संदेश देणारे थोर समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंतीनिम

बीड । प्रतिनिधी
समाजप्रबोधन, स्वच्छता, व्यसनमुक्ती आणि सामाजिक समतेचा संदेश देणारे थोर समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त बीड शहरात भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सार्वजनिक जयंती उत्सवाच्या नियोजनासाठी बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अॅड. सुधीर जाधव यांनी दिली आहे.
ही बैठक रविवार, 8 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजता, राष्ट्रसंत गाडगे महाराज सांस्कृतिक सभागृह, मोंढा रोड, बीड येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस सर्व समाजबांधव, गाडगेबाबांचे अनुयायी, प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते व युवकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. बैठकीचे आवाहन गणेश जगताप, अॅड. सुधीर जाधव, शहराध्यक्ष अंबादास नवले, पप्पू शिंदे, विलास जाधव, जयंत राऊत, जगन्नाथ शिंदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजय जाधव, मनोज वाघमारे, जिल्हा सचिव प्रवीण साळुंके, उपाध्यक्ष जिजा शिंदे, कार्याध्यक्ष संजय साळुंके, मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष संतोष पवार, युवक शहराध्यक्ष मंगेश घोडके, शहर सचिव अतुल साळुंके, कार्याध्यक्ष संतोष भालेकर, शितल राऊत, अमोल काळे, संदीप जाधव, प्रा. विजय जाधव, मनोज नवले, गणेश धोंगडे, विकी नवले, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश घोडके, गणेश राऊत, मनोज नवले, रवी जाधव, गणेश राऊत, महेंद्र वाघमारे यांच्या वतीने करण्यात आले आहे. यावर्षी राष्ट्रसंत गाडगे महाराजांची 150 वी जयंती असल्यामुळे हा उत्सव नेहमीपेक्षा अधिक व्यापक आणि भव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे. बीड शहरात विविध सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन होईल, तसेच गाडगे महाराजांच्या विचारांचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला आहे. जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम, समाजप्रबोधनपर भाषणे, तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमासाठी सर्व घटकांचा समन्वय साधण्यासाठी आणि नियोजन ठरवण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी आयुष्यभर समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा व व्यसनांविरुद्ध संघर्ष केला. त्यांचे विचार आजही प्रेरणादायी असून, त्यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त बीड शहरात मोठ्या उत्साहात व एकतेच्या भावनेने हा सोहळा साजरा करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS