Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गौतम बँकेच्या सभासदांना 15 टक्के लाभांश ः आ.आशुतोष काळे

कोपरगाव ः एखादी सहकारी संस्था स्थापन झाल्यावर त्याचा सकारात्मक परिणाम परिसराच्या विकासावर होवून तो परिसर विकास कसा समृद्ध होतो हे कर्मवीर शंकरराव

नगर अर्बन बँकेत भूकंप, सस्पेन्स घोटाळ्यात गांधी बंधूंना केले आरोपी ; सुरेंद्र व देवेंद्र गांधींना समन्स जारी
कोरोना काळात ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले त्यांना मदत मिळवून देणार – प्रकाश इथापे
देशात 21 ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यास मंजुरी

कोपरगाव ः एखादी सहकारी संस्था स्थापन झाल्यावर त्याचा सकारात्मक परिणाम परिसराच्या विकासावर होवून तो परिसर विकास कसा समृद्ध होतो हे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे संस्थापक माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी सहकारी साखर कारखान्याबरोबरच अनेक संलग्न सहकारी संस्थांच्या केलेल्या स्थापनेतून दिसून येते. यामध्ये गौतम सहकारी बँक अग्रभागी असून संकटातून प्रगतीची शिखरे कशी गाठता येवू शकतात हे बँकेने मागील दहा वर्षात दाखवून दिले आहे.त्यामुळे तोट्यात गेलेली गौतम बँक आज संपूर्ण तोटामुक्त झाली असल्याचे सांगत सभासदांना 15 टक्के लाभांश देण्याची घोषणा आ. आशुतोष काळे यांनी गौतम सहकारी बँकेच्या 49 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.
सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या व कोपरगाव तालुक्यासह शेजारील तालुक्यातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची आर्थिक गरजा वेळेत पूर्ण करणा-या गौतम सहकारी बँकेची 2023-24 या आर्थिक वर्षाची 49 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (दि.17) रोजी बँकेच्या गौतमनगर येथील मुख्य कार्यालयाच्या सभागृहात बँकेचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी सभासदांना मार्गदर्शन करतांना आ.आशुतोष काळे बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे व्हा.चेअरमन बापूराव जावळे होते. यावेळी बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की,गौतम सहकारी बँकेने सातत्याने अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण करतांना रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार काम केले. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण, संचालक दिलीपराव बोरनारे, डॉ.मच्छिंद्र बर्डे, सुनील मांजरे, सुभाष आभाळे, सुधाकर रोहोम, अनिल कदम, श्रीराम राजेभोसले,प्रवीण शिंदे,गंगाधर औताडे, श्रावण आसने,  गौतम बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेब कोते, पंचायत समितीचे मा.सभापती अर्जुनराव काळे, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, शरद पवार पतसंस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे, बँकेचे व्हा सर्व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण संतोष पावडे, प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड, कुक्कुट पालनचे व्हा.चेअरमन विजय कुलकर्णी, कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद, पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार पतसंस्थेचे मॅनेजर मंगेश देशमुख, गौतम सहकारी कुक्कुट पालनचे मॅनेजर सुरेश पेटकर, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट चे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे, आदी मान्यवर उपस्थित होते.  प्रास्तविक प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड यांनी केले. सभेचे सूत्रसंचालन वरिष्ठ अधिकारी सामान्य प्रशासन नानासाहेब बनसोडे यांनी केले तर आभार संचालक सी.ए. दत्तात्रय खेमनर यांनी मानले.सभेचे कामकाज संपल्यानंतर सभासदांसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित, पुणे यांच्या मार्फत प्रशिक्षण आयोजित केले होते.

बँकेचा एनपीए शून्य टक्के असून बँकेकडे 115 कोटींच्या ठेवी – बँकेकडे 115 कोटीच्या ठेवी व कर्ज येणे 71 कोटी 88 लाख असून बँकेला यावर्षी ढोबळ नफा 3 कोटी 38 लक्ष 67 हजार झालेला आहे. त्यातून सर्व कायदेशीर तरतुदींची पूर्तता करून निव्वळ नफा 1 कोटी 16 लाख 87 हजार झाला असून सभासदांना 15 टक्के लाभांश देण्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच एनपीए शून्य टक्के असून चालू आर्थिक वर्षात देखील बँक व्यवस्थापनाने वसुलीसाठी विशेष प्रयत्न करावे असे आवाहन केले. ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांना लघु व कुटीर उद्योग व्यवसाय शेती व शेती पूरक व्यवसायासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास  महामंडळाचे माध्यमातून आतापर्यंत जवळपास 60 कोटीचे कर्ज वितरण करण्यात आले असून नियमित हफ्ता वसुलीमुळे हे कर्ज मार्च 2024 अखेर रू.35 कोटी येणे असल्याचे सांगत ह्या कर्ज वाटपात सहकारी बँकांमध्ये गौतम बँक राज्यात अव्वल स्थानी असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली.

COMMENTS