Homeताज्या बातम्यादेश

दार्जिलिंग रेल्वे अपघातात 15 जणांचा मृत्यू

कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीची धडक दिल्यामुळे घडला अपघात

कोलकाता : पश्‍चिम बंगालमधील दार्जिलिंगमधील न्यूूूू ललपाईगुडी येथे सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मालगाडीने कांचनजंगा एक्सप्रेस (13174) ला मा

बिहारमध्ये रेल्वे अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू
बिहारमध्ये मोठा रेल्वे अपघात
रेल्वे अपघातात मृत्यूचे तांडव

कोलकाता : पश्‍चिम बंगालमधील दार्जिलिंगमधील न्यूूूू ललपाईगुडी येथे सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मालगाडीने कांचनजंगा एक्सप्रेस (13174) ला मागून धडक दिली. या अपघातात कांचनजंगा एक्सप्रेसच्या तीन डब्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत 15 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर 60 प्रवासी जखमी असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येथे कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीची धडक बसली. या अपघातात सुमारे 60प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. यात लोको पायलट आणि गार्डचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. कांचनजंगा एक्सप्रेस सियालदहच्या दिशेने जात होती. त्यानंतर मालगाडीने मागून धडक दिली. त्यामुळे पॅसेंजर ट्रेनच्या तीन बोगी रुळावरून घसरल्या. पूर्व रेल्वेच्या सीपीआरओच्या म्हणण्यानुसार, पॅसेंजर ट्रेनच्या शेवटच्या बाजूला दोन पार्सल आणि एक एसएलआर कोच जोडण्यात आला होता. त्यात प्रवासी नव्हते. दोन लोको पायलट आणि एका गार्डसह 8 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रेनच्या 5 डब्यांचे नुकसान झाले आहे. फिटनेस चाचणीनंतर ट्रेन सियालदहला रवाना केली जाईल. रेल्वे सेवा सिंगल लाईनवर सुरू करण्यात आली आहे. कांचनजंगा एक्सप्रेस आगरतळाहून पश्‍चिम बंगालमधील सियालदहला जात होती. लाल सिग्नलमुळे एक्स्प्रेस ट्रेन सिलीगुडीतील रंगपानी स्टेशनजवळ रुईधासा येथे थांबवण्यात आली. दरम्यान, मागून येणार्‍या मालगाडीने त्यांना धडक दिली. मुसळधार पावसामुळे मालगाडीच्या पायलटला सिग्नल दिसला नाही, त्यामुळे हा अपघात झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. टक्कर इतकी जोरदार होती की एक्स्प्रेस ट्रेनचा एक डबा मालगाडीच्या इंजिनला हवेत लटकला. इतर दोन डबे रुळावरून घसरले. एनडीआरएफ आणि एसडीआरएफसह रेल्वे आणि बंगालचे अधिकारीही बचाव कार्यात गुंतले आहेत. या रेल्वेत अजूनही अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. कटिहार विभागातील रंगपानी आणि निजबारी स्थानकादरम्यान स्थानकावर उभ्या असलेल्या कांचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीने मागून धडक दिली. ही धडक ऐवढी भयंकर होती की, कांचनजंगा एक्स्प्रेसच्या सुमारे तीन बोगी रुळावरून घसरल्या. तर काही बोगी हा मालगाडीच्या इंजिनावर चढल्या, तर एक बोगी दुसर्‍या बोगीवर चढली. या घटनेची माहिती मिळताच कटिहार रेल्वे विभागात खळबळ उडाली आहे. कटिहार आणि एनजेपी येथून अपघातग्रस्त रिलीफ ट्रेन आणि मेडिकल व्हॅनसह रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. या घटनेत 200 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.  

रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक जारी – सियालदाहमध्ये 033-23508794, 033-23833326
गुवाहाटीमध्ये 03612731621, 03612731622, 03612731623
एलएमजी 03674263958, 03674263831, 03674263120, 03674263126, 03674263858

मृतकांच्या कुटंबियांना 10 लाखाची मदत – या अपघातात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला असून 60 जण जखमी झाल्याची माहिती आहे. तसेच या ठिकाणी रेक्यू टीम दाखल झाली असून बचावकार्य सुरू झाले आहे. रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी मृतकांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच जे लोक गंभीर जखमी आहेत, त्यांना अडीच लाख तर जे किरकोळ जखमी आहेत, त्यांना 50 हजार मदत देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS