Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मालकी हक्काची संपत्ती विकून 15 कोटींची फसवणूक

पुणे : करारनाम्याचे उल्लंघन आणि मालकी हक्काची मिळकत परस्पर विकून 15 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध चतु:शृं

न्यूड फोटोशूट करून रणवीर सिंग अडचणीत.
संचालकांनी पारदर्शक कारभार केल्याने आर्थिक सुबत्ता : आमदार मोनिका राजळे
महाराष्ट्र बंदची हाक अवैध !

पुणे : करारनाम्याचे उल्लंघन आणि मालकी हक्काची मिळकत परस्पर विकून 15 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गॅलेक्सी कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड कॉन्ट्रक्टर्सचे संचालक अशोक शिवनारायण थेपडे आणि अमित अशोक थेपडे (दोघेही रा. डी. 22, मंत्री किशोर पार्क, भोसलेनगर, गणेशखिंड रस्ता) यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे तयार करणे, करारनाम्याचे उल्लंघन करून फसवणूक करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमित थेपडे यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत बांधकाम व्यावसायिक विजय अगरवाल यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट 2006 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत घडला. अगरवाल यांची सिद्धिविनायक दुर्गादेवी डेव्हलपर्स कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी आहे. कंपनीने 2000 मध्ये पाषाण येथील 26 गुंठे जमीन जमीन करारनाम्याने विकसनासाठी घेतली होती. त्यांनी ही जमीन 2006 मध्ये गॅलेक्सी कन्स्ट्रक्शन ण्ड कॉन्ट्रक्टरच्या संचालकांना भागीदारीत कराराने विकसनासाठी दिली. करारानुसार बांधकाम गहाण ठेवणे किंवा त्यावर बँकेतून कर्ज काढण्याची परवानगी दिलेली नव्हती. तसेच, बांधकाम नकाशे मंजूर झाल्यापासून 15 महिन्यांत काम पूर्ण करून देण्याचे ठरले होते. करारनाम्यात ठरल्यानुसार बांधकाम पूर्ण करून दिले नाही. त्यामुळे मुदतवाढ दिली होती. तसेच, कोणत्याही तिसर्‍या व्यक्तीस ताबा देण्याचे अधिकार कंपनीला दिले नव्हते. मात्र, गॅलेक्सी कन्स्ट्रक्शन कंपनीला दोन मजल्यांची परवानगी असताना, सात मजली इमारतीचा बनावट बांधकाम नकाशा तयार केला. त्याला महापालिकेने मंजुरी दिली आहे, असे भासवून पिंपरी चिंचवडमधील एका बँकेकडून त्यावर दोन टप्प्यांत 24 कोटींचे कर्ज घेतल्याचे उघडकीस आले. त्यात एका जामीनदाराच्या बनावट स्वाक्षर्‍या करण्यात आल्या आहेत. तसेच अन्य एका बँकेकडूनही सुमारे 6 कोटी 50 लाखांचे कर्ज घेतले. अगरवाल यांच्या हिश्श्यातील चार कोटी रुपये किमतीचे दुकान आणि साडेदहा कोटी रुपये मूल्य असलेले कार्यालय थेपडे यांनी परस्पर विकले. त्यामुळे 15 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिस उपनिरीक्षक मनीष तुले तपास करत आहेत.

COMMENTS