Homeताज्या बातम्यादेश

कुत्रा चावल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

गाझियाबाद प्रतिनिधी - सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वडील आणि मुलगा रुग्णवाहिकेत रडताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दिसणारा म

कार्याला ’माणुसकी’चे श्राध्द; तांबवेच्या पाटील कुटुंबाने दिले मुलांना शैक्षणिक साहित्य
थोरात आणि पटोलेंचे भवितव्य रायपूर अधिवेशनात ठरणार
विखेंचे बॅलन्सशीट तपासण्याची वेळ आता आली आहे… तनपुरेंचा सूचक इशारा

गाझियाबाद प्रतिनिधी – सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वडील आणि मुलगा रुग्णवाहिकेत रडताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दिसणारा मुलगा रेबीजचा रुग्ण असून त्याच्यावर कुठेही उपचार झाले नाहीत, त्यामुळे वडील हतबल झाल्याचं पाहायला मिळत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादमधील विजयनगर येथील चरणसिंग कॉलनीत राहणाऱ्या याकुब यांचा मोठा मुलगा शाहवेज याला कुत्रा चावल्याचे सांगण्यात येत आहे. भीतीपोटी त्याने घरच्यांना याबाबत सांगितले नाही. त्यामुळे जवळपास दीड महिन्यानंतर शाहवेजला पाण्याची भीती वाटू लागली आणि त्याची प्रकृती बिघडली. यानंतर त्याला रुग्णालयात नेले असता त्याला दिल्लीला नेण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, दिल्लीतील कोणत्याही रुग्णालयात मुलावर उपचार होऊ शकले नाहीत, असे सांगण्यात येत आहे.मुलाच्या उपचारासाठी कुटुंबीयांनी त्याला अनेक हॉस्पिटलमध्ये नेलं पण त्याला कुठेही उपचार मिळू शकले नाहीत. अखेर कुटुंबीयांनी त्याला वैद्याकडे नेले. मात्र, मुलाला वाचवता आले नाही. दरम्यान, गाझियाबाद महापालिकेने एका महिलेला नोटीस बजावली आहे जी याकुबच्या शेजारी राहते. ही महिला अनेक कुत्र्यांना खायला घालते, त्यामुळे तिथे कुत्र्यांचा वावर असतो असा आरोप करण्यात आला आहे. येथील कुत्रे अनेक लोकांना चावले आहेत पण ती महिला ही गोष्ट मान्य करत नाही. त्यामुळे आता गाझियाबाद महानगरपालिकेने महिलेला नोटीस बजावून विचारणा केली आहे की, “कुत्र्यांची नोंदणी करून लसीकरण केले आहे का?” शिवाय तिचे उत्तर न मिळाल्यास तिच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय सध्या या मुलाचा आणि वडिलांचा एक फोटो अन्नू खान नावाच्या युजरने शेअर केला आहे. ज्यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.वडिलांच्या कुशीत रडणाऱ्या मुलाचा व्हिडीओ आणि फोटो पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. @WasiuddinSiddi1 नावाच्या ट्विटर युजरने लिहिलं,

COMMENTS