Homeताज्या बातम्यादेश

इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे 14 जणांचा मृत्यू

इंदूर ः देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये दूषित पाणीपुरवठ्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. भागी

राजकारणातील गाफीलपणा
नवऱ्याने पत्नी सह दोन्ही मुलांची चाकू मारून हत्या व स्वतःची आत्महत्या | LOKNews24
सकल मराठा समाजाकडून ठाणे बंदची हाक

इंदूर ः देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये दूषित पाणीपुरवठ्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. भागीरथपुरा परिसरात दूषित पाणी प्यायल्याने आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असून 162 नागरिक विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत, अशी अधिकृत माहिती प्रशासनाने दिली आहे.
मृतांमध्ये अरविंद हिरालाल (वय 43) यांचा समावेश आहे. ते कुलकर्णी भट्टा परिसरातील रहिवासी होते. रविवारी कामानिमित्त भागीरथपुरा येथे गेले असता दूषित पाण्याच्या संपर्कामुळे त्यांची प्रकृती बिघडली. उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी इंदूरला भेट दिली. त्यांनी बाधित रुग्णांची रुग्णालयात जाऊन पाहणी केली तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत आढावा बैठक घेतली.अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रभावी व्यवस्थापन आवश्यक असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठात 2 जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले की, परिसरातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढत आहे.राज्य शासनाने न्यायालयाला माहिती दिली की, इंदूरमधील 10 रुग्णालयांमध्ये सर्व बाधित रुग्णांवर मोफत उपचार सुरू आहेत. यावर न्यायालयाने हे शासनाचे कर्तव्य आहे, अशी टिप्पणी करत संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल 2 जानेवारी रोजी सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

COMMENTS