Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाघनखांसाठी 14 लाखाचा खर्च ः मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण

मुंबई : वाघनखे भारतात आणण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता. यावर आपल्या अधिवेशनाचा एका दिवसाचा खर्

धक्कादायक, दिवसाढवळ्या लावला गळ्याला कोयता | LOK News 24
न्यूड फोटोशूट करून रणवीर सिंग अडचणीत.
…तोपर्यंत समाजातील गुन्हेगारी कमी होणार नाही ः आ. तनपुरे

मुंबई : वाघनखे भारतात आणण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता. यावर आपल्या अधिवेशनाचा एका दिवसाचा खर्च जेवढा आहे त्याच्या कितीतरी पट कमी खर्च झाला असल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. यावर विधानसभेत आज चर्चा झाली असून वाघनखं आणण्यासाठी 14 लाख 8 हजारांचा खर्च झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी वाघनखे आणण्यासाठी कुठल्याही प्रकारचे भाडे दिले जाणार नाही. ते कधीही दिले जात नव्हते असे सांगत सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी एक रुपयाचेही भाड देण्यात आले नसल्याचे विधानसभेत सांगितले. वाघ नख भारतात आणण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता. यावर आपल्या अधिवेशनाचा एका दिवसाचा खर्च जेवढा आहे त्याच्या कितीतरी पट कमी खर्च झाला असल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. वाघनखे आणण्यासाठी जाण्याचा आणि येण्याचा 14 लाख 8 हजार रुपये खर्च झाला असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. वाघनखं ठेवण्यासाठी 7 कोटींचा खर्च आला नसल्याचे सांगत हे पूर्ण असत्य असल्याचे ते मुनगंटीवार म्हणाले. या वाघनख्यांसोबत छत्रपती शिवरायांचा इतर शस्त्रांच्या प्रदर्शनासाठी लागणार्‍या म्युझियमच्या डागडूजीसाठी आणि नूतनीकरणासाठी हे पैसे खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्यभरात छत्रपती शिवरायांचा वाघ नखावरून तसेच त्यासाठी लागणार्‍या खर्चावरून प्रश्‍न उपस्थित होत असताना सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत याविषयी स्पष्टीकरण दिले. शिवाजी महाराज आपला आत्मा आहे. अनेकांनी ही वाघ नखे मिळावी यासाठी पत्रव्यवहार केला. त्यानुसार आपण भारत आणि ब्रिटन यांच्यात एक सामंजस्य करार केला त्यानंतर ही वाघ नखे आपल्याकडे तीन वर्ष राहील असा निर्णय झाला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रतापगडावरील अतिक्रमण थांबवण्यात आले असल्याची ही माहिती त्यांनी दिली. 

COMMENTS